एक्स्प्लोर

Sakshi Dabhekar : साक्षी दाभेकरला नवी उभारी... 'आत्मविश्वासा'च्या पायावर उभं करण्यासाठी अनेकांचा पुढाकार

पाय गमावलेल्या साक्षी दाभेकरला आत्मविश्वासाच्या पायावर उभं करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेकांनी साक्षीला भरभरुन मदत केली आहे.

मुंबई : महाडच्या पोलादपूरमधल्या केवनाळे गावात जेव्हा दरड कोसळली तेव्हा समोरच्या घरातलं 2 महिन्याचं बाळ वाचवायला गेलेल्या क्रिडापटू साक्षी दाभेकर या नववीतल्या 14 वर्षाच्या मुलीनं बाळ वाचवलं पण तिनं पाय गमावला. या बातमीनंतर आता, साक्षीला पुन्हा पायावर उभं करण्यासाठी अनेक हात सरसावलेत. पण, साक्षी जिथे उपचारासाठी आली त्या केईएम रुग्णालय, मुंबईनं तिला आता पुन्हा पायावर उभं करायचं ठरवलंय. केईएममधून तिला नवा कृत्रीम पाय तर बसवला जाईलच. पण, सोबतच मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक अनिल कोकीळ, नवी मुंबईतले विजय चौगुले अशा अनेकांनी साक्षीला भरभरुन मदत केली आहे. यश पॅराडाईज सोसायटीमार्फत विजय चौगुलेंनी साक्षीला ही मदत केली आहे. 

मंत्री एकनाथ शिंदेंनी तर साक्षी आणि तिची मोठी बहिण प्रतिक्षा हिचं शैक्षणिक पालकत्वही स्विकारलंय. विशेष म्हणजे, साक्षीची मोठी बहिण प्रतिक्षा जी सदैव साक्षीसोबतच असते ती नुकतीच 12वी पास झाली आणि साक्षीसोबत  तिच्याही पुढील शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. सुरुवातीला साक्षीला जयपूर फुट बसवला जाईल. त्यानंतर काही महिन्यांनी जर्मन कंपनीचा ऑटोबोक कंपनीचा सोर्बो रबरचा कृत्रीम पाय बसवला जाईल. याचा खर्च 12 लाखांपर्यंत होईल. या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मुंबई महापालिकेनं उचलली आहे. 

पावसाच्या रूपानं अस्मानी संकट या सावित्री खोऱ्यात कोसळत होतं. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. शेजारच्या घरातल्या  नवजात बालकाचा टाहो ऐकला आणि साक्षीनं एका उडीतच शेजारच्या उफाळे कुटुंबाचे घर गाठलं आणि समोर दिसणाऱ्या बाळावर ती उपडी पडली. बाळ वाचलं पण, पुढच्याच मिनिटाला साक्षीनेसुद्धा जोरात किंकाळी फोडली. त्या घराची अर्धी भिंत तिच्या पायावर कोसळली होती. 

साक्षीचे वडील नारायण दाभेकर यांना एकूण तीन मुली. कोरोना संकटामुळे हॉटेलमधली नोकरी होती ती सुटली. इतरांच्या शेतावर जाऊन मोलमजुरी करून मुलींना शिकवून मोठं करण्याचं स्वप्नं. त्यात लहानपणापासूनच धाडसी असलेल्या साक्षी चांगली खेळाडू होईलच हा विश्वास. पण, साक्षीच्या धाडसानं आज या पित्याची मान उंचावलीसुद्धा आणि भविष्याच्या चिंतेनं त्याला ग्रासलंय सुद्धा. 

सुरुवातीला तर गुडघ्याच्या खाली चेंदामेंदा झालेला पाय घेऊन 3 तास चिखल तुडवत हातांचा पाळणा करुनच गावकऱ्यांना तिला तालुक्याच्या ठिकाणी आणावं लागलं, त्यानंतर थेट मुंबई गाठली. अखेर केईएममध्ये पाय कापण्याशिवाय ईलाज नाही हे ऐकल्यानंतर ऑपरेशन झालं. साक्षीचा डावा पाय कापावा लागला. साक्षीला आता पुन्हा आत्ममिश्वासाच्या आणि नव्या आयुष्याच्या पायावर उभं करण्यासाठी अनेक हात पुढे  येत आहेत.

साक्षी नारायण दाभेकरला आर्थिक मदत करण्यासाठी बँक तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रतीक्षा नारायण दाभेकर
बँक ऑफ इंडिया, पोलादपूर शाखा,
A/C No. 120310510002839
IFSC code - BKID 0001203
MICR - 402013520
संपर्क - 8291813078

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget