एक्स्प्लोर

Majha Impact | माहुलवासियांच्या संघर्षाला अखेर यश, एबीपी माझाच्या बातमीमुळं मिळाली हक्काची घरं!

सरकारने या प्रकल्पबाधितांना हक्काचं घर द्यावं यासाठी ते रस्त्यावर संसार मांडून तब्बल 450 दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत होते. एबीपी माझाने त्यांची व्यथा मांडली आणि शासनाने त्याची दखल घेऊन आज त्यांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचा निर्णय केला.

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माहुलवासियांची आज अखेर माहुलच्या नरकातून सुटका झाली आहे. आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहुल मधल्या 206 प्रकल्पबाधितांना गोराई येथील म्हाडाच्या घराच्या चाव्या हस्तांतरित करून त्यांच्या स्थलांतरणाचा मार्ग मोकळा केला. सरकारने या प्रकल्पबाधितांना हक्काचं घर द्यावं यासाठी ते रस्त्यावर संसार मांडून तब्बल 450 दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत होते. एबीपी माझाने त्यांची व्यथा मांडली होती आणि शासनाने त्याची दखल घेऊन आज त्यांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचा निर्णय केला. मात्र अजूनही या माहुल गावात शेकडो परिवार मरणयातना भोगत आहेत. साडे पाच हजार कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे NGT (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) चे आदेश धाब्यावर बसवून प्रदूषण करण्याऱ्या विषारी केमिकल कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या वर्ष अखेरीसपर्यंत माहुल गाव राहण्यायोग्य बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. Majha Impact | माहुलवासियांच्या संघर्षाला अखेर यश, एबीपी माझाच्या बातमीमुळं मिळाली हक्काची घरं! त्यासाठी या केमिकल कंपनींंच्या प्रतिनिधींशी MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभागाच्या अधिकऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. जून अखेरपर्यंत या कंपन्यांना नियमांचं पालन करण्यासाठी योग्य पावलं उचलण्याची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा या कंपन्यांवर बंदीच्या कारवाईचा बडगा उचलणार असल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

माहुलमध्ये प्रकल्पबाधितांचं होणारं पुनर्वसन थांबवा, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन द्या : हायकोर्ट

मागच्या युतीच्या सरकारच्या काळातही माहुलवासीयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र त्या सरकारमध्ये न्याय देण्याची इच्छाशक्ती होती का असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यामुळे माहुलवासीयांची घरं असोत किंवा गिरणी कामगारांची घरं, ठाकरे सरकार 100 दिवस पूर्ण करत असतांना युती सरकारच्या काळातील प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्याचा धडाका लावत असल्याचं यातून स्पष्ट होतंय. Majha Impact | माहुलवासियांच्या संघर्षाला अखेर यश, एबीपी माझाच्या बातमीमुळं मिळाली हक्काची घरं! काय आहेत माहुलकरांच्या भावना ? आज नवीन जीवन मिळाल्यासारखं वाटतंय. आज 'घर बचाव, घर बनाव' आंदोलनाने 496 दिवस पूर्ण केले. आंदोलनाने 500 दिवसांचा टप्पा गाठण्याअधिच हक्काच्या घराची चावी हातात मिळाली याचा आनंद आहे. हे आमच्या संघर्षाचं यश आहे. यंदाची होळी आम्ही नवीन घरात साजरी करु. यासाठी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, सरकार आणि एबीपी माझाच्या विशेष आभार मानतो, अशी भावना माहुलवासियांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Embed widget