(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची माध्यमांना प्रतिक्रिया; म्हणाले...
Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे.
Aryan Khan Drugs Case : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात वसुली केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरीही रंगल्या आहेत. अशातच समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नी डॉक्टर शबाना कुरेशी यांचे वडिल डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी एबीपी न्यूजसोबत खास बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले की, हे लग्न अरेंजमॅरेज होतं, लव्ह मॅरेज नव्हतं. लग्नापूर्वी तीन-चार वर्ष अगोदर आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि हे देखील माहीत होतं की, ते कुटुंब मुस्लिम आहे. ते म्हणाले की, ते आमच्याकडे मुस्लिम बनून आले होते.
जाहिद कुरेशी म्हणाले की, त्यावेळी समीर वानखेडे यूपीएससीची तयारी करत होते आणि नमाज पठणानासाठी मशिदीतही जात होते. ते म्हणाले की, आम्हालाही माध्यमांमधून समजलं की, ते हिंदू आहेत. जाहिद म्हणाले की, आमच्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर या दुःखातून आम्ही सावरलो होतो. परंतु, जेव्हा हे प्रकरण माध्यमांसमोर आलं त्यावेळी मात्र बोलावं लागलं.
समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचे वडिल पुढे बोलताना म्हणाले की, समीर वानखेडे लग्नापूर्वीचे सर्टिफिकेट दाखवत आहेत. परंतु, जाहिदाशी लग्न केल्यानंतर सर्टिफिकेट दाखवत नाहीत. ते म्हणाले की, मला आधीपासूनच माहिती होतं की, आमचे व्याही दाऊद वानखेडे आहेत. जाहिद पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हा माझ्या मुलीचं लग्न झालं होतं त्यावेळी ते मस्लिम होते आणि ते सर्वांना माहिती होतं. तसेच ते म्हणाले की, पण त्यांनी युपीएससीची परीक्षा पास केल्यानंतर नोकरी कोणत्या कोट्यातून मिळवली याबाबत काही माहिती नाही.
डॉ. जाहिद कुरेशी यांनी नवाब मलिकांकडून करण्यात येणाऱ्या दाव्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की, जेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी त्यांना माध्यमांसमोर यावं लागलं. ते म्हणाले की, आम्ही आमच्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर सर्वकाही विसरलो आहोत. तसेच आम्हाला कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :