एक्स्प्लोर

Exclusive : सार्वजनिक बांधकाम खात्याची कोट्यवधींची उधळण? 'या' शासकीय इमारतीच्या खर्चाचा तपशील 'माझा'च्या हाती

सार्वजनिक बांधकाम खात्याची कोट्यवधींची उधळण होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील अवंती-अंबर इमारतीवर झालेल्या खर्चाचा तपशील ' एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.

मुंबई : राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, असं असताना देखील एका शासकीय इमारतींच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आयपीएस, आयएएस आणि काही मंत्री ज्या ठिकाणी राहतात, त्या अवंती-अंबर इमारतीच्या डागडुजीसाठी तब्बल साडेआठ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, अवंती-अंबर या इमारतीच्या छोट्यातल्या छोट्या कारणांसाठी खर्च झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर, जेवढा खर्च कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, तितका खर्च तरी नक्की करण्यात आला आहे का? अशीही शंका या कामाकडे पाहिल्यानंतर उपस्थित करण्यात येत आहे. 

राज्याची तिजोरी रिकामी होत असताना ती भरली कशी गेली पाहिजे? याचा विचार करायचा सोडून तिजोरी खाली करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत. आयपीएस, आयएएस आणि काही मंत्री सध्या ज्या ठिकाणी वास्तव्य करतात, त्या अवंती-अंबर इमारतीवर केलेला खर्च ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. या इमारतीवर तब्बल साडे आठ कोटींची फक्त डागडुजी करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार, अंवती अंबर या इमारतीच्या छोट्यातल्या छोट्या कारणांसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. 

अवंती-अंबर या इमारतीत अनेक बडे अधिकारी राहतात. ती इमारत अतिजिर्ण झालेली दाखवत हे काम केलं गेलं आहे. यामध्ये सर्वप्रकारची डागडुजी करण्यात आली असंल्याचं काढलेल्या बिलात म्हटलं गेलंय. प्रश्न हा आहे की, डागडुजी नेमकी कोणाच्या भल्यासाठी केली जाते? कंत्राटदार की, इमारतीतले रहिवाशी? चार-चार कोटींची बिलं काढतंय कोण? एका इमारतीवर किती खर्च करावा यासाठी काही मर्यादा असायला हव्यात की नाही?  2020 च्या अखेरीस सह्याद्री गेस्ट हाऊसच्या सिलिंगला तात्पुरती डागडुजी आणि रंगरंगोटी करण्यात आली. यासह सह्याद्री गेस्ट हाऊसच्या संपूर्ण याच कामाचे बील तब्बल दीड कोंटीपेक्षा जास्त काढण्यात आलं आहे. 

एकीकडे कोरोना, वादळं, पूरपरिस्थितीमुळं सरकारचं कंबरडं मोडलं. पण दुसरीकडे मात्र सरकारच्या तिजोरीवर भार देऊन पैसै उकाळण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून केलं जातंय. याआधीही मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. तिच कामं संपत नाहीत, तोपर्यंत सिलिंगसारखी कामं दाखवून कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचं काम सुरु झालंय का? अशी शंका सगळीकडे उपस्थित केली जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Embed widget