(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Exclusive : 'अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात', स्वीय सचिव पलांडेंची कबुली, कारवाईचा तपशील माझाच्या हाती
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खास करुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील माझाच्या हाती लागला आहे. ईडी कोर्टात अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध मोठा आरोप करण्यात आला आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे, अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खास करुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी 4 मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे. पलांडे यांच्या या कबुलीमुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
'माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ED चौकशीसाठी हजर राहणार नाहीत', देशमुखांच्या वकिलांची माहिती
अनिल देशमुखांच्या जवळच्या लोकांच्या नावावर एकूण 11 कंपन्या
ईडीच्या तपासानुसार अनिल देशमुख, त्यांच्या दोन मुलांच्या आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य, काही जवळच्या लोकांच्या नावावर एकूण 11 कंपन्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे
- M/S Rabia logistics pvt ltd
- M/s Blackstone logistics pvt ltd
- M/s Concrete Enterprise pvt ltd
- M/s Nautical Warehousing pvt ltd
- M/s Parabola warehousing Pvt Ltd.
- M/s Bio natural organic Pvt Ltd.
- M/s katol energy PVt Ltd.
या सात देशमुख परिवारांच्या कंट्रोलमध्ये आहेत. यातील आणखी चार कंपन्यांची नावं मिळू शकलेली नाही. ही नावं ईडीकडून देण्यात आली आहेत. या सात वगळून आणखी काही 13 कंपन्यांचा तपास सुरु आहे. यातील काही नाव खाली दिली आहेत. आणखी काही कंपन्यांची नावं कळू शकलेली नाहीत.
- M/s Contemporary Securities PVt Ltd.
- Greenland Buildspace PVT LTD.
- M/s Sublime warehousing Pvt Ltd.
- M/s Vishvesh logistics Pvt Ltd.
- M/s Aroma Enterprises Pvt Ltd.
- Tvaotels suits
- M/s Mrigtrishna Trading Ltd
ईडीच्या तपासानुसार या सगळ्या कंपनीचा कंट्रोल अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांकडे होता आणि या कंपन्यांच्या माध्यमातून मोठी उलाढाल केली जात होती. या प्रकरणात ईडीने एकून 6 ठिकाणी छापेमारी केली. नागपूर, अहमदाबाद, मुंबईमध्ये या कंपन्यांचे 6 डायरेक्टर आणि दोन सीए यांचे जबाब नोंदवले. ज्यामध्ये सगळ्यांनी मान्य केलं आहे की अनिल देशमुख आणि त्यांचं कुटुंब या कंपन्या चालवत होते.
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे
ईडीने या प्रकरणात विक्रम राज शर्मा नावाच्या डमी डायरेक्टरचीही चौकशी केली. विक्रम हा वरीलपैकी 4 कंपनींचा मालक दाखवला गेला होता. त्याने ईडीला माहिती दिली की , या सगळ्या कंपन्या अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख चालवत होता. देशमुख यांचे सीए प्रकाश रमानी यांनी देखील या कंपन्या देशमुख परिवार ऑपरेट करत असल्याच ईडीला माहिती दिली.
सचिन वाझेचा आणखी एक गौप्यस्फोट
सचिन वाझेने ईडीला आपल्या जबाबात सांगितलं की, त्याने बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टीच्या माध्यामातून मुंबईतील 60 बार मालकांकडून 4.70 कोटी रुपयांची वसुली केली आणि ते पैसे अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यामध्ये दिले.
बोगस कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल
या सोबतच नागपूर इथे सुरु असलेले चॅरिटेबल ट्रस्ट साई शिक्षण संस्था हे देशमुख कुटुंब चालवतं. या ट्रस्ट मध्ये 4.18 कोटींच्या चेक एंट्री केल्या गेल्या. हे पैसे दिल्ली येथील कंपनी M/s Reliable finance corporation pvt ltd, M/s VA Realcon pvt ltd, M/s Utsav Securities pvt ltd, M/s Sital Leasing and finance pvt ltd यांच्याकडून या ट्रस्टमध्ये आले. ईडी तपासामध्ये हे निष्पन्न झालं की या कंपन्या बोगस आहेत आणि यांचा वापर पैशांची उलाढाल करण्यासाठी केला जातो. या कंपनीचे मालक सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन नावाचे दोन भाऊ आहेत. यांनी ईडीला माहिती दिली की डोनेशनच्या नावाने त्यांना हे 4.18 कोटी देशमुख यांच्या नागपूर ट्रस्टमध्ये ट्रान्सफर केले. ही रक्कम त्यांना देशमुख यांच्या काही लोकांना कॅश आणून दिली. ईडीचा दावा आहे की ही रक्कम पलांडे आणि कुंदन शिंदे यांनी दिली. पलांडे आणि कुंदन हे अनिल देशमुखांसाठी मनी लॉडरिंग करायचे असा दावा ईडीने केला आहे.