Papon: 'मोह-मोह के धागे' सारखं मधुर गाणं गाणारा गायक आणि संगीतकार पपॉन याच्या उपस्थितीने एबीपी आयडियाज ऑफ इंडियाच्या (ABP Ideas of India Summit 2022) मंचावर सुरांची मैफिल रंगली. या मंचावर बोलताना त्याने आपले अनेक गीत गायले. यासोबतच त्याने या मंचावर आपलं मनही मोकळं केलं आहे.

  


या कार्यक्रमात बोलता पपॉन म्हणाला आहे की, ''माझ्या पहिल्या गाण्यानंतर मला 3 वर्षे दुसरे कोणतेही गाणे मिळाले नाही. म्हणून मला वाटले की कदाचित माझ्या आवाजात बॉलीवूड वाली बात नसेल. मात्र याशी मला कोणतीही अडचण नव्हती. करण माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं. मी जेव्हाही आसाममध्ये गायचो तेव्हा असे म्हटले जायचे की, मी येथील मुलगा आहे, तर गाणारच. मात्र मी दिल्लीचा आभारी आहे की, इथल्या लोकांना माझा आवाज आवडला. मी इथे बँडसोबत कामही केलं.''


मी आजकाल गुलजारसाहेबांना भेटतोय - पपॉन


प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्याबद्दल बोलता पपॉन म्हणाला आहे की, आजकाल गुलजारसाहेबांना भेटल्यावर त्यांनी जे सांगितले होते. ते आठवते की, 'लकीरें हैं रहने दो- किसी ने खींची थी.' ... मात्र संगीतासोबत रेषाही पुसल्या जातात आणि दुरावाही संपतो. संगीत संस्कृतींमध्ये भेदभाव करत नाही आणि संगीतामध्ये कोणामधीलही अंतर भरून काढण्याची ताकद आहे. यावेळी त्याने एक कुमाओनी गाणे गायले. जे आसाममधील पहाडी गाणे म्हटले जाते. 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणे गायले


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणेच योग्य आहे, असं तो म्हणाला आहे. यावेळी त्याने एबीपीच्या मंचावर हे गाणे सादर देखील केले. याशिवाय त्यांनी यापूर्वी 'आज जाने की जिद ना करो' गाऊनही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आजच्या काळातील कच्चा बदाम आणि बचपण का प्यार या गाण्यांबाबत तो म्हणाला की, मी हे सर्व ऐकलं नाही, संगीतात जे चांगले आहे. ते कायम राहील आणि जे निरुपयोगी आहे, ते नाहीसे होईल, असे मला वाटते.


इतर महत्वाच्या बातम्या: