ABP Ideas of India Summit 2022 : एबीपी आयडियाज ऑफ इंडियामध्ये (ABP Ideas of India Summit 2022) दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार शशी थरूर आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी हजेरी लावली. जेव्हा आपण स्वातंत्र्य, संस्थात्मक स्वातंत्र्य आणि भारताच्या कल्पनेबद्दल बोलतो, तेव्हा तुम्ही त्यांना एकत्र कसे पाहता? यावर काँग्रेस खासदारशशी थरूर यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, ही भारतीयांच्या मर्जीची बाब आहे. आपला स्वातंत्र्यलढा विचारधारेवर, साम्यवादी विरुद्ध भांडवलदार किंवा भूगोलावर अवलंबून नव्हता. 


शशी थरूर यांनी म्हटले की, 'तुमच्या राष्ट्रीयत्वावरून धर्म ठरवता येईल का? ज्यांना वाटले की आपली ओळख आपल्या धर्मावरून झाली, ते पाकिस्तानात गेले. ही पाकिस्तानची भूमिका होती. ज्यांना वाटले की आपण बहुसंख्याक बहुलवादी समाजाचा भाग होऊ, त्यांनी भारताची उभारणी केली.' ते पुढे म्हणाले, पाकिस्तान इस्लामवर विश्वास ठेवतो आणि भारतात राष्ट्रवाद संविधान आणि संस्थात्मकतेवर आधारित आहे. हा आपला राष्ट्रवाद आहे. जेव्हा आपण कायद्याबद्दल बोलतो तेव्हा तो आपल्या राष्ट्रवादाचा आधार असतो.'


थरूर यांनी सांगितले की, 'ब्रिटिशांनी मुस्लिम, हिंदूंच्या एका विशिष्ट वर्गाप्रमाणेच गटांना सशक्त केले पाहिजे किंवा प्रत्येक भारतीयाला सशक्त केले पाहिजे याबाबत संविधान सभेतही या विषयावर चर्चा झाली होती. आपल्या देशात प्रत्येक माणसाला समान संधी आहेत. तो देशात कुठेही कोणत्याही पदावर पोहोचू शकतो. त्यासोबतच स्वातंत्र्याची कल्पनाही निर्माण झाली.'






 


'आपल्या देशात प्रत्येकजण राजकारणाबद्दल बोलू शकतो आणि संविधानाच्या माध्यमातून कायदा प्रत्येकाला सहमत आणि असहमत होण्याचा अधिकार असल्याची हमी देतो. कोणत्याही सरकारला मत देण्याचा किंवा विरोधात मतदान करण्याचा अधिकार आहे. सरकारवर जाहीर टीका करण्याचा आणि समर्थन करण्याचाही अधिकार आहे. सर्वांना समान अधिकार आहेत. आपली राज्यघटना भारत काय आहे हे सांगते.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha