Karan Johar: चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहर सध्या एबीपी आयडियाज ऑफ इंडिया (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाच्या मंचावर बोलत आहे. करण जोहर म्हणाला की, ''आता भारतीय चित्रपट उद्योगाला बॉलीवूड म्हणणे बंद केले पाहिजे. कारण हा हॉलीवूडच्या आधारे बनलेला शब्द आहे, जो बॉम्बेला जोडून बॉलिवूड झाला. आता याचे नाव  'इंडियन फिल्म इंडस्ट्री' असायला हवे. कारण यात तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सिनेमांचा समावेश आहे आणि याचे उदाहरण 'पुष्पा' सारख्या चित्रपटातून पाहायला मिळते. राजामौली हे या क्षणी स्पष्टपणे सर्वात मोठे भारतीय चित्रपट निर्माते आहेत. कोणीही त्यांच्याकडून हा खिताब काढून घेऊ शकत नाही.''


'कुछ कुछ होता है'बद्दल करण जोहर म्हणाला 


या कार्यक्रमात बोलताना करण जोहर म्हणाला आहे की, 'कुछ कुछ होता है' मध्ये त्याने त्या सर्व चित्रपटांमधील गोष्टींचा वापर केला आहे. जो तो लहानपणापासून पाहत आला आहे. तो म्हणाला आहे की, ''हा चित्रपट मी खूप मनापासून आणि प्रेमाने बनवला आहे. विशेषत: तरुणांना हा चित्रपट खूप आवडला आणि मी उघडपणे सांगू शकतो की हा माझा सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.''


ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल काय म्हणाला करण जोहर?


करण जोहर म्हणाला की, ''ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविड महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि यामुळे चित्रपट निर्मात्यांना बरेच निर्णय बदलावे लागले. 'शेरशाह' ऑगस्टमध्ये आला जेव्हा देशात कोरोनाची मोठी रुग्ण संख्या होती. असे असूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली. यावरून दिसून येते की प्रेक्षक चित्रपटगृहात येत नसतानाही, भारतात चित्रपटांसाठी एक जागा आहे. परिस्थिती अनुकूल असती तर हा सिनेमा चित्रपटगृहात नक्कीच प्रदर्शित झाला असता. पण तसे होऊ शकले नाही.'' करण जोहर पुढे म्हणाला की, ''2022 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी बदल घेऊन येणारे वर्ष ठरेल आहे. तुम्हाला हे देखील मान्य करावे लागेल की Amazon सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट यशस्वी होत आहेत आणि लोकांना याद्वारे चांगला कंटेंट पाहायला मिळत आहे.''


इतर महत्वाच्या बातम्या: