Jagdeep Dhankhar: एबीपी आयडियाज ऑफ इंडियामध्ये (ABP Ideas of India Summit 2022) दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि शशी थरूर यांनीही हजेरी लावली. यावेळी राज्यपाल जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जगदीप धनखर म्हणाले की, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे काम संविधानाचे रक्षण करणे आहे. या दोन्ही पदांच्या शपथविधीही खूप वेगळ्या आहेत. ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेवर आपला विश्वास असायला हवा. पण पश्चिम बंगालचा राज्यपाल म्हणून मी गेली अडीच वर्षे त्रास सहन करत आहे. दुर्दैवाने आज देशाला आतून आणि बाहेरून अशा दोन्ही बाजूनी आव्हानांचा सामना करावा लागत आहे, जगातील कोणत्याही देशाला अशा आव्हानांचा सामना करावा लागत नसल्याचं ते म्हणाले आहेत.


एबीपी आइडियाज ऑफ इंडिया समिट 2022 मध्ये काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर आणि जगदीप धनखर यांच्यात काही मुद्द्यांवर जोरदार वाद देखील झाले. यावेळी शशी थरूर म्हणाले की, ''ममता बॅनर्जी या प्रभावशाली नेत्या आहेत आणि त्यांनी स्वतःच्या बळावर राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे.'' दुसरीकडे जगदीप धनखर म्हणाले की, ''ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत. 30 वर्षांपूर्वी त्यांना दुखापत झाल्यावर मी त्यांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालला गेलो होतो. मात्र असं असलं तरी कधीकधी नातेसंबंध टिकवण्यासाठी लहान बहिणीला देखील आरसा दाखवणे गरजेचं आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचार कोणीही नाकारू शकत नाही.''


जगदीप धनखर म्हणाले, ''निवडणुकीच्या वेळी जे घडले ते कोणापासून लपलेले नाही. पश्‍चिम बंगालमध्ये माध्यमे नाहीत, हे सांगायला मला अजिबात संकोच वाटत नाही. तिथे मुख्यमंत्र्यांना कोणीही प्रश्न विचारू शकत नाही, वरिष्ठ संपादकांनाही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. मीडियाला आपले काम करता येत नाही. येथील ग्राउंड रिअ‍ॅलिटी दाखवा, अशी मी मीडियाला हात जोडून विनंती करतो.'' ते म्हणाले, ''पश्चिम बंगालमधील जमिनी हकीकत एवढी कटू आहे की, राज्यपाल म्हणून मला माझे काम का करता येत नाही.''



आयडियाज ऑफ इंडिया समिटमध्ये सहभागी झालेले जगदीप धनखर म्हणाले की, ''आपण आपल्या इतिहासातील सर्वात नाजूक टप्प्यातून जात आहोत. मी जेव्हा पश्चिम बंगालच्या कोणत्याही भागात जातो, तेव्हा तिथे प्रत्येक भागात कोणीतरी असा असतो, जो भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढला होता. आज देशासमोरील आव्हाने मोठी आहेत.''