एक्स्प्लोर

मुलांना वाचवण्याच्या नादात हेलिकॉप्टर कोसळलं?

मुंबई: मैदानात इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी जागा होती, पण तिथं मुले खेळत होती, त्यामुळे हेलिकॉप्टरचं लँडिंग करता आलं नाही, अशी माहिती कोसळलेल्या हेलिकॉप्टरमधून बचावलेल्या कर्मचाऱ्याने दिला. मुंबईतील आरे कॉलनीत रॉयल पामजवळ रविवारी दुपारी हेलिकॉप्टर कोसळलं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी आहेत. आरे कॉलनीत कोसळलेल्या हेलिकॉप्टरप्रकरणी आता तपासाला सुरुवात झाली आहे. तपासासाठी दिल्लीची डीजीसीएची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या अपघातात बचावलेल्या तिघांपैकी एकाचा जवाब पोलिसांनी नोंदवला. टेक्निशिअयन शंकरच्या जबाबानुसार "इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी जागा होती, पण तिथे मुलं खेळत असल्यानं लॅन्डिंग करता आलं नाही" मुलांचा जीव वाचवताना  हा अपघात झाल्याचं  सूत्रांनी दिलेल्या माहितीतून कळतंय. आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळलं आकाशातून मुंबई दर्शन करण्यासाठी रितेश आणि ब्रिंदा मोदी हे दाम्पत्य रविवारी सकाळी अमन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून झेपावलं. मात्र आरे कॉलनीत निर्जन स्थळी कोसळून पायलट प्रफुल्ल मिश्राचा मृत्यू झाला होता. कोसळलेलं हेलिकॉप्टर जुहू एअर बेसवरुन 12 वाजताच्या सुमारास निघालं होतं. जॉय राईडसाठी हेलिकॉप्टर ठाणे परिसरात गेलं होतं. ठाण्यावरुन परतत असताना फिल्टर पाडा परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर अमन एव्हिएशन या खासगी कंपनीचं असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातून परतत असताना क्लचमध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. पायलटनं फिल्मसिटीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला हेलिपॅडवर उतरता न आल्यामुळे पायलटनं एमर्जन्सी लँडिग केलं. यावेळी हेलिकॉप्टर कोसळून त्याला आग लागली. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी दोघेजण पायलट होते, तर दोघे जॉय राईडसाठी आलेले प्रवासी होते.

संबंधित बातमी

मुंबईच्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळलं, एकाचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde Resignation : फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांचा राजीनामा
दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांचा राजीनामा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resigned : धनंजय मुंंडे यांचा राजीनामा, मंत्रिपदावरुन पायउतार ABP MAJHAAnjali Damania Full PC : धनंजय मुंडेंना उचलून फेकून द्या, अंजली दमानियांच्या अश्रूंचा बांध फुटलाDhananjay Munde Resignation:थोड्याच वेळात धनंजय मुंडेंचा राजीनामा,राजकारण्यांच्या संतप्त प्रतिक्रियाDhananjay Munde Resignation | धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार, फडणवीसांना सुपूर्द करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde Resignation : फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
फक्त राजीनामा नको, धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करून त्यांना सहआरोपी करा; सचिन खरात संतापले
Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?
Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना होणार लाभ? भुजबळांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ? 'या' नेत्यांच्या नावाचीही चर्चा
दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांचा राजीनामा
दहा वर्षात महाराष्ट्र सरकारमधील चार मंत्र्यांचा राजीनामा
Karuna Sharma on Santosh Deshmukh Case : ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर : करुणा शर्मा
Dhananjay Munde Net Worth :धनंजय मुंडेंच्या ताफ्यात बुलेट ते मर्सिडीज बेन्झ, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?
धनंजय मुंडेंचा अखेर राजीनामा, बुलेट ते मर्सिडीज बेन्झ कारसह विविध वाहनं ताफ्यात, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?
Suresh Dhas & Pankaja Munde: पंकजा मुंडेंना बीड नव्हे तर ट्रम्प-बायडेनबद्दल प्रश्न विचारा, त्या इंटरनॅशनल नेत्या; सुरेश धसांचा हल्लाबोल
पंकजा मुंडेंना बीड नव्हे तर ट्रम्प-बायडेनबद्दल प्रश्न विचारा, त्या इंटरनॅशनल नेत्या; सुरेश धसांचा हल्लाबोल
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रीया, सहआरोपी करा, सरकार बरखास्तीसह या प्रमुख मागण्या
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रीया, सहआरोपी करा, सरकार बरखास्तीसह या प्रमुख मागण्या
Embed widget