Aaditya Thackeray : 'भाजपनं याकूबचा मृतदेह कुटुंबाला का दिला'; पेंग्विन सेना म्हणाणाऱ्यांनाही आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले...
Aaditya Thackeray on Yakub Memon : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून वाद सुरु आहे. दहशतवाद्याचा मृतदेह कुटुंबियांना देत नाहीत, याकूबचा मृतदेह भाजपनं का दिला, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
Aaditya Thackeray on Yakub Memon Grave : मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून (Yakub Memon) वाद सुरु आहे. यावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shivsena MLA Aaditya Thackeray) यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. दहशतवाद्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत नाहीत. हा सरकारचा नियम आहे. पण भाजप सरकारनं याकूब मेमनचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विचारला आहे. याकूब मेमनची अंत्ययात्रा आणि अंत्यविधीसाठी तत्कालीन भाजप सरकारनं परवानगी कशी दिली, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
याकूब मेमनच्या कबरीचा आणि पालिकेचा काहीही संबंध नाही. स्वत:च्या चूकीचं खापर दुसऱ्याचा डोक्यावर फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. ती जागा खाजगी ट्रस्टची आहे. याकूब मेमनचा दफन विधी झाला तेव्हा भाजपचं सरकार होतं. त्यावेळी दहशतवाद्याचा दफन विधीला सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. कसाबप्रमाणे याकूब मेमनला दहशवाद्यासारखी वागणूक का नाही दिली. याकूबचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात का दिला, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
पेंग्विन सेना म्हणाणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचं उत्तर
दरम्यान, पेंग्विन सेना म्हणाणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सणसणीत उत्तर दिलं आहे. 'मुंबईत पेंग्विन आणले याचा आम्हांला अभिमान आहे. पेंग्विन आणण्याआधी जिजामाता उद्यान तोट्यात होतं. पेंग्विन आणल्यानंतर जिजामाता उद्यान सुरळीत सुरु झालं. दररोज सुमारे 30,000 लोक उद्यानाला भेट देऊ लागले. आम्ही नुकसान भरून काढलं. त्यामुळे कितीही नावं ठेवली तरी आम्ही अभिमानास्पद कामगिरी केली हेच खरं आहे', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरु'
विरोधकांकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राजकारण करतानाही पातळी ठरवायला हवी. धार्मिक प्रकरणावरून वाद निर्माण करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाजपनं शिवसेनेवर काय आरोप केला होता?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करताना म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासोबत तडजोड का केली. भाजपचं सरकार हिंदुत्व सोडणार नाही. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण होत असताना तेव्हाचं सरकार गप्प का बसलं. असा सवाल करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या माफीची मागणी केली. मुंबईला छिन्नविछिन्न करणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण ही अतिशय गंभीर बाब असल्याचं ही बावनकुळे यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या