एक्स्प्लोर
ओव्हरटेक करण्यावरुन वाद, धक्काबुक्कीत एकाचा पुलावरुन खाली पडून मृत्यू
कल्याण: ओव्हरटेक करण्याच्या वादातून झालेल्या बाचाबाचीत एका इसमाचा पुलावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना कल्याणमधील दुर्गाडीजवळ घडली आहे.
कल्याणच्या दुर्गाडी पुलाजवळून जाणाऱ्या चारचाकीला एका दुचाकीनं ओव्हरटेक केलं. चारचाकी चालक असद सय्यद यानं खाली उतरुन दुचाकीस्वाराला याचा जाब विचारला. यावेळी झालेल्या बाचाबाचीत दुचाकीस्वार आणि त्यासोबतच्या दोघांनी असदला धक्काबुक्की केली.
याचवेळी धक्काबुक्कीत असद सय्यद हा पुलावरुन खाली पडला. यातच असदचा मृत्यू झाला. असद सय्यद असं मृत इसमाचं नाव असून ते मुळचे नाशिकचे आहेत. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीवरील तिघांचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement