एक्स्प्लोर

15 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर! डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबईतील एका 15 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून 16 सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे.

मुंबई : मुंबईतील एका 15 वर्षीय लहान मुलाच्या फुफ्फुसातून 16 सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, एखाद्या फुटबॉलच्या आकारा इतकी ही गाठ मोठी होती. या गाठीचे वजन 1.5 किलो इतके होते. या शस्त्रक्रियेमुळे मुलाचे प्राण वाचले आहे.

भायखळा मध्ये राहणारा प्रतीक बरकडे (वय 15) या मुलाच्या उजव्या छातीच्या पोकळीत 16 सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची सुमारे दीड किलो वजनाची गाठ होती. ही गाठ एखाद्या फुटबॉल इतकी मोठी होती. या गाठीला सॉलिटरी फ्रायबर ट्यूमर असे म्हणतात. या मुलाला छातीत दुखणं, दम लागणं, खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. ही कोविड-19 ची लक्षणं असल्याने कुटुंबियांना तातडीने वोक्हार्ट रूग्णालय गाठले. याठिकाणी छातीचा सीटीस्कॅन करण्यात आला. या वैद्यकीय चाचणी अहवालात फुफ्फुसात गाठ असल्याचं निदान झालं. हा ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टरांना सांगितले.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे.

याबाबत माहिती देताना डॉ. भालेराव म्हणाले की, ‘‘सध्या कोरोनाच्या भितीपायी अनेक रूग्ण रूग्णालयात उपचारासाठी येणं टाळत आहेत. त्याचप्रमाणे प्रतिकवरही वेळेवर उपचार न झाल्याने त्याच्या वयाबरोबर ट्यूमर वाढत होता. हा ट्यूमर फुटबॉलच्या आकारा इतका मोठा झाला होता. या गाठीमुळे फुफ्फुसे, श्वसननलिका व हदय यावर विपरित परिणाम होऊ लागला होता. यासाठी शस्त्रक्रिया करणं फार गरजेचं होतं. त्यानुसार डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करून रूग्णाचे प्राण वाचवले आहे.’’

‘‘फुफ्फुसात आढळून येणारे हे ट्यूमर अतिशय दुर्मिळ असते. धुरामुळे होणाऱ्या संसर्गामुळे हा त्रास उद्भवू शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय आहे.” असे ही ते पुढे म्हणाले.

प्रतीकचे वडील मयूर बरकडे म्हणाले की, “आमच्या मुलाला श्वास आणि खोकला येत होता पण त्यामागील कारण आम्हाला समजू शकले नाही. कोविड-19 च्या भितीपायी आम्ही रूग्णालयात येणं टाळत होतो. फुफ्फुसात ट्यमूर असल्याचं ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. पण वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच निदान व शस्त्रक्रिया करून माझ्या मुलाचे प्राण वाचवले आहे. आता प्रतिकच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो पूर्वीप्रमाणं सामान्य आयुष्य जगू लागला आहे."

महत्वाची बातमी : एबीपी माझा डिजिटल इम्पॅक्ट | रुग्णांवर किती ऑक्सिजन वापरावा यावर बंधन नाही

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget