एक्स्प्लोर

'मुंबईतील 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत', नितेश राणेंचा गौप्यस्फोट

मुंबई: अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी पालिकांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांचेच ठाणे अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी समोर आणली आहे. मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांपैकी एक-दोन नव्हे तर तब्बल 72 पोलीस स्टेशन्स अनधिकृत असून या स्टेशन्सकडे स्वत:च्या नावे वीज, पाणी, टेलिफोन्सचे कनेक्शन नसल्याचे उघडकीस झाले आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.   गेले चार महिने राज्याच्या गृहखात्याकडून पोलिसांच्या मुलभूत सोयी-सुविधांबाबत माहिती मिळविताना आम्हाला फार अडचणी आल्या. पोलिसांबाबत गृहखात्याचा कारभार अत्यंत हलगर्जीपणे चालवला जात असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केले.   'गृहखात्याकडून आम्हाला आमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नसले तरी मुंबईतील 94  पोलीस ठाण्यांपैकी 72 पोलीस ठाणे अनधिकृत असल्याची माहिती आम्ही मिळवली आहे. अशी अनधिकृत स्टेशन्स सरकार चालवतेच कशी हा प्रश्न मला पडला आहे. राज्यात अनेक भूखंड स्वखर्चाने घेणाऱ्या सरकारकडे पोलीस स्टेशन्ससाठी निधी कसा नाही?' असा सवालही त्यांनी केला.   एवढेच नव्हे तर पोलीस स्टेशन्सची सर्व बिले व तसेच स्टेशन्समध्ये लागणाऱ्या अन्य गोष्टींचा खर्चही वरिष्ठ पोलीस निरीक्षक उचलत असल्याचेही त्यांनी समोर आणले.   राज्यात बाइक चालवण्यासाठी हेल्मेट सक्ती आहे. पण बाइकस्वारांच्या पावत्या फाडणाऱ्या पोलिसांच्या गणवेशात हेल्मेटचा समावेशच नाही. याचाच अर्थ त्यांना हेल्मेट सक्ती नाही, असाच होतो.   ज्या प्रकारे पोलीसांना सुविधा पुरविण्यात गुहखाते हलगर्जीपणा दाखवत आहे, तसेच त्यांच्या आरोग्याकडेही ते दुर्लक्ष करीत आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंना संरक्षण देताना त्यांच्या मागे असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातील 85 टक्के चालकांच्या दृष्टीत दोष आहे. याची कल्पना असूनही गृहखाते या चालकांकडे कानाडोळा करून सकंटांना आमंत्रण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.   बूट अनकम्फर्टेबल, मग गुन्हेगाराचा पाठलाग कसा करणार ?   'पोलीसांना सध्या दिले जाणारे बूट हे सोयीचे नसतात. तसेच जी बूटं आहेत ती कम्फर्टटेबलही नाहीत. त्यामुळे अशा बूटांवर पोलीस गुन्हेगारांचा पाठलाग कसा करतील. हे बूट तात्काळ बदलून त्यांना धावता येईल अशी उत्कृष्ठ दर्जाची बुटं द्यावी.' असेही आमदार नितेश राणे यांनी गृहखात्याला कळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget