एक्स्प्लोर
गेल्या 6 दिवसात मुंबईत रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू
![गेल्या 6 दिवसात मुंबईत रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू 61 People Died In A Railway Accident In Mumbai In The Last 6 Days Latest Update गेल्या 6 दिवसात मुंबईत रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/07000729/thane-local-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मुंबईत गेल्या सहा दिवसात रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर उपघात झाले आहेत. या अपघातात तब्बल 61 जणांन जीव गमवावा लागला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू शनिवारी झाले आहेत. शनिवारी एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी तब्बल 15 जणांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी कुर्ला स्थानकातच 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहेत. तर कल्याणनजीक झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इतर स्थानकात 7 जणांचा मृत्यू झाला.
मुंबईतील लोकल सेवेवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या दररोज वाढत असताना लोकल फेऱ्या मात्र मर्यादित आहे. त्यामुळे अनेकदा प्रवाशी जीवावर उदार होऊन प्रवास करतात. यामुळे बऱ्याचदा अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. दरम्यान, प्रवाशांनी लोकलनं प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येतं आहे.
1 मे ते 6 मे दरम्यान रेल्वे अपघातातील मृत्यूंची संख्या:
- 1 मे- रेल्वे अपघातात 10 जणांचा मृत्यू
- 2 मे- रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू
- 3 मे- रेल्वे अपघातात 9 जणांचा मृत्यू
- 4 मे- रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू
- 5 मे- रेल्वे अपघातात 3 जणांचा मृत्यू
- 6 मे- रेल्वे अपघातात 15 जणांचा मृत्यू
एकूण- 61 जणांचा मृत्यू.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)