एक्स्प्लोर
मुंबईत हार्बर मार्गावर लोकलचे 6 डबे रुळावरुन घसरले, वाहतूक विस्कळीत
आज सकाळी 9.07 वाजता सीएसटीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले.
मुंबई : मुंबईत माहिमजवळ हार्बर मार्गावर लोकलचे 6 डबे रुळावरुन घसरले, त्यामुळे सीएसटीकडून अंधेरीकडे जाणारी हार्बर वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघातात 3 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर दुरुस्तीसाठी किमान दुपारचे 2 वाजणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आज सकाळी 9.07 वाजता सीएसटीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले. या ही लोकल 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणं अपेक्षित होतं, मात्र 7 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रकवरुन 5 नंबरचा ट्रॅक बदलताना लोकलचे 6 डबे घसरले, ज्यात तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या तीन प्रवाशांमध्ये 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सकाळीच हा अपघात झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement