एक्स्प्लोर
Advertisement
बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर मुंबईकरांचे हाल
महापौर बंगल्यावर महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसोबतच्या बैठकीनंतरही बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत. आज (रविवार) मध्यरात्रीपासून 36 हजार बेस्ट कर्मचारी संपावर जाणार आहेत.
महापौर बंगल्यावर महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत तोडगा न निघाल्याने बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार 10 तारखेपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवू, असं आश्वासन महापौरांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.
मात्र जोपर्यंत आयुक्तांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवणार असल्याचं बेस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं मागच्याच आठवड्यात चार दिवस वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. 6 ऑगस्टपर्यंत आपल्या वेतनविषयक मागण्या मान्य न झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य न झाल्यानं ते आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचं हत्यार उपसलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement