एक्स्प्लोर
Advertisement
बोगस टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश, ठाण्यातून तिघेजण अटकेत
पोलिसांनी अटक आरोपी आणि फरारी आरोपी यांच्या घराच्या झडतीत तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर अटक आरोपीच्या घरात एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
ठाणे : सरकारी महसूल आणि आयएसडी कॉलचा कर बुडवीत मुंब्र्यात चालणाऱ्या बोगस टेलिफोन एक्सचेंजचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका फरारी आरोपीचा शोध पोलीस पथक घेत आहे.
पोलिसांनी अटक आरोपी आणि फरारी आरोपी यांच्या घराच्या झडतीत तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर अटक आरोपीच्या घरात एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणातील विदेशातील मास्टरमाईंडचा शोध पोलीस घेणार असल्याची माहिती सहआयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुणाला अटक केलं आणि त्यांच्याकडे काय सापडलं?
मुंब्रा पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंगवर असलेले पोलीस उपनिरीक्षक बडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कादर पॅलेस, कौसा आणि मुंब्रा परिसरात चार ठिकाणी बोगस टेलिफोन एक्सेचेंज चालविण्यात येत आहेत. सदर माहितीनंतर मुंब्रा पोलिसांनी माहितीतील चार ठिकाणी वेगवेगळी पथके बनवून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या छापेमारीत पोलिसांनी शेहजाद निसार शेख (30) याच्याकडून तीन सिम स्लॉट, चार वायफाय राउटर, दोन यूएसबी वायर, तीन चार्जर, एअरटेल, व्होडाफोन कंपनीचे 75 सिम असा दोन लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या घरात पोलिसांना एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसेही सापडल्याने पोलीस चक्रावले.
दुसरा आरोपी शकील इकलाख अहमद शेख (40) याच्याकडून पाच सिम स्लॉट बॉक्स, दोन वायफाय राउटर, एक लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, एअरटेल, एमटीएनएल कंपनीचे 55 सिमकार्ड असा तीन लाख 75 हजारांचा मुद्देमाल सापडला.
तिसरा आरोपी मोहम्मद हलीम मुक्तार अहमद खान (36) याच्याकडून पोलिसांना तीन सिम स्लॉट बॉक्स, दोन वायफाय राउटर, चार यूएसबी वायर, दोन चार्जर, व्होडाफोन कंपनीचे 59 सिमकार्ड असा दोन लाख चार हजारांचा मुद्देमाल सापडला.
मास्टरमाईंड फरार
या प्रकरणातील फरारी आरोपी वसूलउल्ला इकलाख अहमद शेख मूळचा आझमगडचा असून, तो पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी छापा मारला असता, त्याच्या घरातून आठ सिम स्लॉट बॉक्स, 17 वायफाय राउटर, 96 एंटीना केबल, एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीचे 102 सिम असा तब्बल 14 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
आरोपी नेमकं काय करत असतं?
आरोपी या बोगस टेलेफोन एक्सेचेंजचा वापर परदेशातील लोकांशी संपर्क करण्यासाठी करत होते. ज्या व्यक्तीला या एक्सेचेंजमधून कॉल करायचा आहे, त्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडरचा वापर करुन हॅलो गल्फ हे सॉप्टवेअर वापरुन त्याद्वारे कॉल करण्यात येत होता. त्यामुळे सरकारला द्यावा लागणार कर चुकविण्यात येत होता. तर आयएसडीद्वारे कॉल बायपास करुन तो सिम बॉक्समध्ये घेऊन कन्व्हर्ट करत तो हव्या असलेल्या लोकल फोनवर डायव्हर्ट करण्यात येत असल्याने फोनवर बोलणे व्हायचे. पण हा कॉल कुठून आला किंवा कुणाला केला याचा शोध घेणे हे अडचणीचे ठरत असल्याने याचा वापर करण्यात येत असल्याची माहिती सहआयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या बोगस टेलिफोन एक्सचेंजमध्ये दुबईतील मास्टरमाईंडचा शोध पोलिस घेणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement