एक्स्प्लोर
मुंबईतील चुन्नाभट्टीत हिट अँड रन, मद्यधुंद चालकानं फरफटत नेल्यानं 20 वर्षीय तरुणीचा बळी
मद्यधुंद चालकाने नेत गाडीखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर बाजूने जाणाऱ्या दोन महिलाही जखमी झाल्या. या जखमी महिलांना उपचारासाठी शेजारील दळवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीत चालकासोबत तिघेजण होते, त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई : चुनाभट्टी येथील धावजी केणी मार्गावरील साईबाबा मंदिरजवळ 19 वर्षाच्या मुलीला मद्यधुंद चालकाने धडक देऊन गाडीखाली चिरडले. या हीट अँड रन प्रकरणातील अपघातात युवतीचा जागीचा मृत्यू झाला असून दोन महिलादेखील जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी फिर्यादी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चुनाभट्टी येथील धावजी मार्गावरून रात्री ठीक 8.45 वाजण्याच्या सुमारास व्ही. एन. पूरव मार्गावर हा अपघात झाला. या कारमधील मद्यधुंद चालकाने बाजारात खरेदी करुन घरी चालत जाणाऱ्या दोन मुली व एका महिलेला धडक दिली. त्यामध्ये अर्चना पारठे वय (19वर्षे) या मुलीला चालकाने स्वदेशी मिल चाळ नंबर 113 येथे फरफटत नेत गाडीखाली चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर बाजूने जाणाऱ्या दोन महिलाही जखमी झाल्या. या जखमी महिलांना उपचारासाठी शेजारील दळवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले आहे. गाडीत चालकासोबत तिघेजण होते, त्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. धडक देणाऱ्या गाडीत एकूण तीन तरुण होते. ते पूर्णपणे नशेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. यावेळी भरधाव कारने जवळपास चार ते पाच गाड्यांचे नुकसान केले. पोलिसांनी गाडीतील 2 तरूणांना अटक केली आहे. परंतु गाडीचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. चुनाभट्टी परिसरात झालेल्या अपघातात संदर्भात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली असून या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांच्या कारवाईवर आम्ही समाधानी आहोत त्यामुळे आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेत आहोत, असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. Hit and Run | चुनाभट्टीमध्ये भरधाव कारच्या धडकेत 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांचा संताप | ABP MAJHA
आणखी वाचा























