एक्स्प्लोर
दाऊदचा साथीदार फारुख टकलाला दुबईतून अटक
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून आज (गुरुवार) सकाळी मुंबईत आणलं गेलं.

मुंबई : 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून आज (गुरुवार) सकाळी मुंबईत आणलं गेलं. त्याला थोड्याच वेळात टाडा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. फारुख टकलाविरोधात 1995 साली रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. टकला यानं 93 साली मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतर भारताबाहेर पलायन केलं होतं. फारुख टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार होता. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची मुख्य भूमिका होती. शस्त्रात्र उतरवणं, बॉम्ब तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मुंबईतील स्फोटाच्या काही दिवस आधी तो भारताबाहेर निघून गेला होता. आजवर सीबीआयने त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अखेर सीबीआयच्या प्रयत्नांना आज यश आलं. आतापर्यंत टकलाने सुरक्षा यंत्रणांना बऱ्याचदा चकवा दिला होता. याआधी तो दुबई, यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता. दरम्यान, फारुख टकलाची अटक हे सीबीआयचं मोठं यश मानलं जात आहे. टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार असल्याने त्याच्याकडून दाऊदबाबतची बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.
(फारुख टकला) 12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. 12 मार्च 1993 रोजी काय झालं ? पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार आठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल याकूब मेमनच्या फाशीबाबत काय काय घडलं? सप्टेंबर 2012- मेमन कुटुंबातील 4 सदस्यांना कोर्टाने दोषी ठरवलं. 21 मार्च 2013- सुप्रीम कोर्टाने याकूब मेमनची फाशी कायम ठेवली. इतर 10 जणांची फाशी जन्मठेपेत बदलली. आधी जन्मठेप सुनावलेल्या 18 पैकी 16 जणांची जन्पठेप सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली 30 जुलै 2013- याकूब मेमनची पहिली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 14 ऑगस्ट 2013- डेथ वॉरन्टची तारीख निश्चित झाली 11 एप्रिल 2014- राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी याकूब मेमनची दया याचिका फेटाळली 2 जून 2014- फाशीच्या शिक्षेविरोधात याकूब मेमनने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर चेंबरऐवजी ओपन कोर्टमध्ये सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 9 एप्रिल 2015- फाशीविरोधातील दुसरी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 21 जून 2015- 30 जुलैला होणारी फाशी रोखण्यासाठी याकूब मेमनची सुप्रीम कोर्टात धाव 27 जुलै 2015- क्युरेटिव्ह पिटीशनच्या सुनावणीवरुन वाद 28 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांमध्ये याकूबवरुन मतभेद 29 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाने याकूबची फाशीविरोधातील याचिका फेटाळली. राष्ट्रपतींनीही दयायाचिका फेटाळली. 30 जुलै 2015- सकाळी 7 वाजता याकूब मेमनला नागपूर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. संबंधित बातम्या 1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार!
(फारुख टकला) 12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. 12 मार्च 1993 रोजी काय झालं ? पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले. दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार आठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल याकूब मेमनच्या फाशीबाबत काय काय घडलं? सप्टेंबर 2012- मेमन कुटुंबातील 4 सदस्यांना कोर्टाने दोषी ठरवलं. 21 मार्च 2013- सुप्रीम कोर्टाने याकूब मेमनची फाशी कायम ठेवली. इतर 10 जणांची फाशी जन्मठेपेत बदलली. आधी जन्मठेप सुनावलेल्या 18 पैकी 16 जणांची जन्पठेप सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली 30 जुलै 2013- याकूब मेमनची पहिली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 14 ऑगस्ट 2013- डेथ वॉरन्टची तारीख निश्चित झाली 11 एप्रिल 2014- राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी याकूब मेमनची दया याचिका फेटाळली 2 जून 2014- फाशीच्या शिक्षेविरोधात याकूब मेमनने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर चेंबरऐवजी ओपन कोर्टमध्ये सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 9 एप्रिल 2015- फाशीविरोधातील दुसरी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 21 जून 2015- 30 जुलैला होणारी फाशी रोखण्यासाठी याकूब मेमनची सुप्रीम कोर्टात धाव 27 जुलै 2015- क्युरेटिव्ह पिटीशनच्या सुनावणीवरुन वाद 28 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांमध्ये याकूबवरुन मतभेद 29 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाने याकूबची फाशीविरोधातील याचिका फेटाळली. राष्ट्रपतींनीही दयायाचिका फेटाळली. 30 जुलै 2015- सकाळी 7 वाजता याकूब मेमनला नागपूर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. संबंधित बातम्या 1993 मुंबई साखळी स्फोट : 7 सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार! 1993 बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरच शिक्षा सुनावणार
मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू
1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत आजपासून युक्तीवाद
1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद
12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष
संबंधित फोटो फीचर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























