एक्स्प्लोर

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले 151 चेक बाऊन्स

काही महाभागांनी तर खात्यात पैसे नसलेल्या आणि बंद असेलेल्या खात्याचे चेक सहाय्यता निधीला दिले आहेत. माहितीच्या अधिकारात जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मिळवली आहे.

मुंबई : फक्त राजकीय नेतेच जनतेला गाजर दाखवतात असं नाही, तर जनतासुद्धा नेत्यांना गाजर दाखवते. कारण विविध योजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आलेले 151 चेक वटलेले नाहीत. विविध सरकारी योजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीचं आवाहन केलं जातं. मुख्यमंत्र्यांबरोबर छानछोक फोटो काढून सहाय्यता निधीसाठी चेकही दिले जातात. मात्र असे 151 चेक बँकेत वटलेच नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलं आहे. काही महाभागांनी तर खात्यात पैसे नसलेल्या आणि बंद असेलेल्या खात्याचे चेक सहाय्यता निधीला दिले आहेत. माहितीच्या अधिकारात जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मिळवली आहे. राज्यातील दुष्काळ, जलयुक्त शिवार अशा योजनांसाठी मुख्यमंत्री आवाहन करतात आणि त्याला जनतेतून प्रतिसाद येतो. काही जण स्वतःच्या खिशातून किंवा ट्रस्ट मधून पैसे देतात. पण हा देखील फक्त एक स्टंट असल्याचं समोर आलं आहे. सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे मुख्यमंत्र्यांना घसघशीत रक्कमेचा चेक द्यायचा, फोटो काढायचा आणि चेकच पेमेंट न करण्याचा सूचना बँकेला द्यायचा असाही प्रकार घडला आहे. कांतीबेन रसिकलाल शहा चॅरिटेबल ट्रेस्टकडून दुष्काळ निवारणासाठी 51 लाख रुपयांचा चेक स्वीकारतानाचा मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. मात्र याच ट्रस्टने बँकेला चेकचं पेमेंट थांबवलं, हा चेक अजून वटलेला नाही, असं  माहिती अधिकारात नमूद केलं आहे. पण मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण देत पहिला चेक काही कारणाने मागे घेण्यात आला आणि नंतर 43 लाख आणि आठ लाखाचे दोन चेक दिल्याचं स्पष्ट केलं आहे. एकूणच फक्त नेतेच लोकांना आश्वासन देतात असं नाही, जनताही नेत्यांना मदतीचं गाजर दाखवते, हेच यातून दिसतं. मुख्यमंत्री सहायता निधीची एकूण चार खाती आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी : 350, 29, 69, 122 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी (जलयुक्त) : 19, 79, 49, 053 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ) : 29, 29, 24, 648 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी (शेतकरी मदत) : 6, 55, 15, 617 रुपये (हे खातं 30 जून 2017 पासून सुरु) 4 खाती मिळून : 405 कोटी 93 लाख 58 हजार 440 रुपये (2015-16 आणि 2016-17 या वर्षांत आलेला निधी) यातून खर्च सुमारे 372 कोटी रुपये वैद्यकीय मदतीवर, जलयुक्त शिवार, दुष्काळ निवारणाची कामे, अपघाती मृत्यू, जळीतग्रस्त, कृत्रिम अवयव प्रत्यारोपण इत्यादी कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. या रकमेत एनईएफटी, आरटीजीएस, साखर कारखान्यांकडून मिळणारा लाभांश तसंच धनादेश इत्यादी स्त्रोतातून पैसे आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात ताडीच्या अतिसेवनाने आतापर्यंत तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, कुटुंबीय आक्रमक

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime: देवीच्या दर्शनाला गेल्या, रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
देवीच्या दर्शनानंतर रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Embed widget