एक्स्प्लोर

भाजीपाला, फळांचे दर कडाडणार! इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीवर 15 टक्के दरवाढ

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला मुंबई आणि संपुर्ण उपनगरांना पुरवला जातो. एपीएमसीमधून दिवसाला 2 हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. मात्र आता या मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : गेल्या काही महिन्यात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्याने मालवाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे. डिझेलच्या किंमती 90 रूपयांच्या घरात गेल्याने 15 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने घेतला आहे. 1 मार्चपासून भाडेवाढ होणार असल्याने भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा महाग होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला मुंबई आणि संपुर्ण उपनगरांना पुरवला जातो. एपीएमसीमधून दिवसाला 2 हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. मात्र आता या मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या डिझेल 87 रूपयांवर पोहोचल्याने दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण मालवाहतूक दार संघटनेने दिले आहेत. डिझेल 61 रूपये होते तेव्हा ठरवण्यात आलेले टेम्पोभाडे आजही आहे तेच आहे. मुंबई मालवाहतूक टेम्पो महासंघाने येत्या 1 मार्चपासून मालवाहतूक भांड्यात 15 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. डिझेल बरोबर टायर, टोल, इन्शुरन्स, स्पेअरपार्ट, पार्किंग इत्यादी गोष्टीतही गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याने ड्रायव्हर लोकांचा पगार देणे आणि गाड्यांचे बॅंक हप्ते भरणे मुश्किल झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याने येत्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

सध्या असलेले मालवाहतूक दर :

3 ते 4 टनाची टेम्पो गाडी :

एपीएमसी - दहिसर - 3500 रूपये एपीएमसी - बोरिवली - 3500 रूपये एपीएमसी - गोरेगांव - 3000 रूपये एपीएमसी - अंधेरी - 2500 रूपये एपीएमसी - मुंबई विमानतळ - 2500 रूपये एपीएमसी - भायखळा - 2500 रूपये एपीएमसी - कल्याण - 2500 रूपये एपीएमसी - चेंबूर - 1700 रूपये एपीएमसी - क्राॅफर मार्केट - 3000 रूपये एपीएमसी - वसईविरार - 4000 रूपये एपीएमसी - पनवेल - 2000 रूपये

15 टक्क्यांची दरवाढ केल्यानंतर

एपीएमसी - दहिसर - 4100 रूपये एपीएमसी - बोरिवली - 4100 रूपये एपीएमसी - गोरेगांव - 3450 रूपये एपीएमसी - अंधेरी - 2875 रूपये एपीएमसी - मुंबई विमानतळ - 2875 रूपये एपीएमसी - भायखळा - 2875 रूपये एपीएमसी - कल्याण - 2875 रूपये एपीएमसी - चेंबूर - 1955 रूपये एपीएमसी - क्राॅफर मार्केट - 3450 रूपये एपीएमसी - वसईविरार - 4600 रूपये एपीएमसी - पनवेल - 2300 रूपये

एपीएमसीमधून जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाला, कांदा बटाटा, फळांच्या मालवाहतूक भाड्यात वाढ होणार असल्याने याचा परिणाम किंमती वर होणार आहे. भाडेवाढ झाल्यास साहजिकच त्याचा भुर्दंड ग्राहकांवर बसणार आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून चढ्या दरात भाजीपाला, कांदा बटाटा, फळे विकली जाणार असल्याने महागाई आपोआपच वाढणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
'एक तास वाट बघायला लावली', नाना पाटेकर तिरमिरीत निघून गेले; ओ रोमिओच्या ट्रेलर लॉन्चवेळी नेमकं काय घडलं? विशाल भारद्वाज यांनी सगळं सांगितलं!
'एक तास वाट बघायला लावली', नाना पाटेकर तिरमिरीत निघून गेले; ओ रोमिओच्या ट्रेलर लॉन्चवेळी नेमकं काय घडलं? विशाल भारद्वाज यांनी सगळं सांगितलं!
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Embed widget