एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिनेट निवडणूक : अभाविपचा दारुण पराभव, 10 जागांवर युवासेना विजयी
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनं एक हाती विजय मिळवत भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेनं एक हाती विजय मिळवत भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला आहे. 10 पैकी 10 जागांवर युवासेनेचे उमेदवार निवडून आले आहेत.
2010 साली देखील युवासेनेनं ही निवडणूक जिंकली होती. यंदा युवासेनेसमोर अभाविप आणि काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या उमेदवारांचं तगडं आव्हान होतं. पण युवासेनेनं जोरदार मुसंडी मारत या निवडणुकीत एक हाती विजय मिळवला.
दरम्यान, 25 मार्चला झालेल्या या निवडणुकीसाठी एकूण 62 हजार पदवीधर मतदारांनी मतदान केलं होतं. यावेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला होता. युवासेनेचा हा विजय आदित्य ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
संबंधित बातम्या :
सिनेट निवडणूक : युवासेनेसमोर अभाविप आणि एनएसयूआयचं आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement