Mumbai Rains: मुंबईत पहाटेपासून संततधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी, येत्या काही तासांत दमदार पावसाचा अंदाज
Mumbai Rain: मुंबईत आज सकाळपासून पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात दमदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. राज्यभरात पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण. मुंबईत जोरदार पाऊस बसरण्याची शक्यता
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पाऊस मुंबईत परतल्याचे दिसत आहे. मंगळवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगर परिसरात पावसाच्या काही मुसळधार सरी कोसळल्या होत्या. त्यानंत रात्रभर अधुनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे. मात्र, बुधवारी पहाटेपासून मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगर परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता हा पाऊस दिवसभर पडणार की काही तासांमध्ये पाऊस (Rain) पुन्हा गायब होणार, हे पाहावे लागेल. मात्र, पावसाची संततधार सुरु राहिल्यास प्रथेप्रमाणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो. सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि ढगांचा गडगडाट सुरु आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये दमदार पाऊस (Monsoon 2024) पडण्याचा अंदाज आहे.
यंदा मान्सून मुंबईत गेल्यावर्षीपेक्षा लवकर पोहोचला होता. मात्र, सुरुवातीचा एक दिवस झालेला पाऊस वगळता मुंबईवर वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. त्यामुळे मुंबईतील उकाडा (Mumbai Temperature) अजूनही कायम असून मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. याशिवाय, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने जवळपास तळ गाठला आहे. परिणामी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सध्या पाणीकपात लागू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चांगला पाऊस व्हावा, अशी आस लागली आहे.
राज्यभरात पावसाची ओढ
राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत. राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69 टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडले आहेत. मात्र, कृषी तज्ज्ञांकडून चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात अनेक भागात चांगला पाऊस झाला. खरीप पेरणीला वेग आल्याच चित्र आहे . मात्र, कृषी विभागाने पाऊस चांगला झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन केल्यानंतरही पेरणी करण्यासाठी शेतकरी मात्र घाई करत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबईत दमदार पावसाचा अंदाज
मुंबईत 18 जूनपासून (Mumbai) मुसळधार पावसाचा इशारा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिला होता. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहिती 18 ते 25 जूनपर्यंत आठवडाभर, मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
आणखी वाचा
मुंबई, ठाण्यात पाऊस पाच दिवस सुट्टीवर; 21 जूननंतरच जोर वाढणार, तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता