एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Raj Kundra Case: पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल

Raj Kundra Case: पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून राज कुंद्राविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज कुंद्रा आणि इतर आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Raj Kundra Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखीन एक पुरवणी आरोपपत्रदाखल केलं आहे. यात व्यावसायिक राज कुंद्रासह (Raj Kundra) अन्य आरोपींविरोधात आणखीन काही पुरावे पोलिसांनी कोर्टात  सादर केले आहेत. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात हे पुरवणी आरोपपत्र सादर केलं. याप्रकरणी राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. 

मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानंच राज कुंद्रासह त्याचा सहकारी आणि आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना सप्टेंबर 2021 मध्ये 50 हजारांचा जामीन मंजूर केला होता. आरोपींवर जी कलमं लावण्यात आलीत त्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. या गोष्टी ग्राह्य धरत मुंबईतील किला कोर्टानं या दोघांना जामीन मंजूर केला होता. 

गेल्यावर्षी राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी सुमारे दिड हजार पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. यात राज कुंद्राचा नातलग प्रदीप बक्षी आणि एक अन्य आरोपी यश ठाकूर यांचा समावेश आहे. या सर्वांवर पिडीत मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी गंभीर आरोप लावले होते.

या पुरवणी आरोपपत्रात कुंद्राच्या मोबाईलमधील इतर आरोपींसोबतचे संदेश लॅपटॉपमध्ये सापडलेल्या 60 हुन अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप पोलिसांनी सोबत जोडलेल्या होत्या. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात ठेवले आहेत. तसेच राज कुंद्रा फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 पर्यंत आर्म्स प्राइममध्ये संचालक होते. तेव्हा, हॉटशॉटमधून उत्पन्न झालेला महसूल आणि पैसे केनरिन कंपनीच्या लॉयन्स बँक ऑफ जमा केले होते. प्रदीप बक्षी हे लंडनमधील केनरिन कंपनीचे संचालक होते. 

आरोपी, साक्षीदारांचे जबाब आणि ईमेल आणि संगणकावरून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत गूगलकडून 20 लाख 24 हजार 776 रुपये मिळाले, दुसरीकडे, अँपलकडून ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 पर्यंत 1 कोटी 16 लाख 58 हजार 925 रुपये मिळाले असल्याचं आरोपत्रात नमूद करण्यात आलेलं होतं.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी 4 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी मुंबईतील मालाडमधील मालवणी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. या बंगल्यात अश्लील चित्रपट चित्रीत केले जात असून त्यासाठी मुलींवर दबाव टाकला जात होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या बंगल्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यानंतर 9 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदा 3 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्यानंतर जुलै महिन्यात राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार थॉर्प यांना अटक केली. त्यानंतर पुरवणी आरोपपत्रात कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी आणि यश ठाकूर यांना वॉण्टेड जाहीर करण्यात आलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget