एक्स्प्लोर

Mumbai News : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये तळीरामांनी लावली मोठी आग; सुमारे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक 

Mumbai News : मुंबईच्या बोरिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये तळीरामाने मोठी आग लावल्याची घटना घडली आहे.

Mumbai News : मुंबईच्या बोरिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) जंगलामध्ये तळीरामाने मोठी आग लावल्याची घटना घडली आहे. होळीनिमित्त मोठ्या संख्येमध्ये तळीराम संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलालगत असलेला दहिसर परिसरात गेले होते. यावेळी संध्याकाळी सहाच्या सुमारास दहिसर नॅशनल पार्कच्या जंगलामध्ये अचानक मोठे आगीचे लोट दिसून आले. प्राथमिक माहितीनुसार ही आग तिथल्या तळीरामाकडून लावण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार ते पाच गाड्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मधले सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 1 ते दीड तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र या आगीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचा अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झालं आहे. तर ही आग कोणी लावली? या संदर्भात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे सुरक्षारक्षक आणि पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वनवा लागण्याची घटना ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या रावलपाडा नियत क्षेत्रातील सर्वे नं. 345ब मधील असून संध्याकाळी 7 च्या सुमारास लागलेली आग ही ८ वाजता कु. उ. बो. वनक्षेत्र अधिकरी, वन कर्मचारी आणि Rapid Response Team च्या प्रयत्नाने पूर्णपणे विझवण्यात आली.

81 वाहन चालक तळीरामांवर कारवाई

ठाणे पोलिस आयुक्तालयात ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवड निमित्त ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकूण 81 वाहन चालक तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे.  या कारवाईत मोठ्या प्रमाणात दंड वसूल देखील करण्यात आला आहे. धुळवड सणानिमित्त कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम आखण्यात आली होती. या कारवाईमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांवर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.  

धुलीवंदनाच्या दिवशी तिघांचा बुडून मृत्यू, देहूतील दुर्दैवी घटना

पुण्यातील देहूत धुलीवंदनाच्या दिवशी बुडून तिघांचा मृत्यू झालाय. इंद्रायणी नदीवर ही दुर्दैवी घटना घडली. घरकुल परिसरातील 10 ते 12 तरुण पोहण्यासाठी दुपारी देहूत गेले होते. चार वाजताच्या दरम्यान हे सगळे मित्र पाण्यात उतरले. मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास काहीजण पाण्याच्या मधोमध गेले, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं काहीजण बुडाले. एकाला स्थानिकांनी वाचवले. पण तिघांचा यात जीव गेलाय. मावळच्या वन्यजीव रक्षक पथकाने बचावकार्यात मदत केली. देहूतील या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630 AM 15 March 2025Thane Mahapalika No Audit| ठाणे मनपात 337 कोटींचा झोल, घोटाळ्याची पोलखोल? Special ReportAamir Khan Love Story | वयाची साठी, प्रेमाच्या गाठी; अमिरची नवी गर्लफ्रेंड कोण? Special ReportPolitical Holi | रंगांच सण, रंगावरूनच राजकारण; धुलवडीच्या उत्सवात रंगांची वाटणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget