(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mukhtar Ansari Died : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी मृत्यू, तुरुंगात आला होता हृदयविकाराचा झटका, उपचारादरम्यान निधन
Mukhtar Ansari Died : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) मृत्यू झालाय. ह्रदयविकाराच्या झटक्याने अन्सारीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mukhtar Ansari Died : कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा (Mukhtar Ansari) मृत्यू झालाय. ह्रदयविकाराच्या झटक्याने अन्सारीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच मुख्तार अन्सारीला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल करताच अन्सारीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्याचा मृ्त्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला ? हे पाहाणे अतिशय महत्वाचे ठरणार आहे.
14 तास मुख्तार अन्सारीवर उपचार
मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) तुरुंगात असताना चक्कर आली. त्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. दरम्यान, रुग्णालयातील प्रशासनाने त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुरुंगात हलवण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही तासांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. 14 तास मुख्तार अन्सारीवर उपचार करण्यात आले मात्र, तो वाचू शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्तारला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर 9 डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, तरिही तो वाचू शकलेला नाही. यापूर्वी मंगळवारी त्याला मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते.
मुख्तार अन्सारीवर योगी सरकारकडून कारवाई
मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांच्याविरोधात योगी सरकारने कारवाई केली होती. सरकारकडून मुख्तार अन्सारीचा काळा कारभार उधळून लावण्याचा प्रयत्न सुरु होता. त्यानंतरच्या काळात मुख्तार अन्सारीची प्रकृती सातत्याने बिघडत होती. मुख्तार अन्सारी राजकारणी देखील होता. त्याच्या परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. राजकारणी आणि गुंडगिरीशी निगडित असलेल्या व्यक्तीला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. हेल्थ इमरजन्सीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
सुनावणी दरम्यान मुख्तार अन्सारीकडून गंभीर आरोप
मुख्तार अन्सारीने (Mukhtar Ansari) न्यायालयात सुनावणी दरम्यान, गंभीर आरोप केले होते. तुरुंगात माझा खून करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेवणातून सौम्य स्वरुपात विष देण्यात येत आहे. त्यामुळेच माझी प्रकृती बिघडत आहे. या प्रकरणी न्यायालयाने जेल प्रशासनाकडून या मुख्तार अन्सारीचा संपूर्ण अहवाल देखील मागवला होता. मुख्तारच्या (Mukhtar Ansari) मृत्यूनंतर गाझीपूर, मऊ आणि इतर संवेदनशील जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आलाय. शिवाय पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. गाझीपूर आणि मऊमधील काही भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या