MPSC Exam 2025: एमपीएससी परीक्षा अन् निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी होणार? जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार, विद्यार्थीही संभ्रमात
MPSC Exam 2025: राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठीची मतमोजणी लांबल्याने त्याचा थेट परिणाम एमपीएससी परीक्षेवर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Maharashtra Election 2025 : राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (2 डिसेंबर) मतदान पार पडलंय. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळं आज (3 डिसेंबर) होणारी मतमोजणी लांबणीवर पडली आहे. तर आता 21 डिसेंबरलाच मतमोजणीअंती या निवडणुकांचा निकाल कळू शकणार आहे. तर दुसरीकडे नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्याने त्याचा थेट परिणाम एमपीएससी परीक्षेवर (MPSC Exam 2025) होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
MPSC Exam 2025: एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी
नगरपरिषद नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्याने एमपीएससी परीक्षा आणि मतमोजणी एकाच दिवशी आली आहे. परिणामी 21 डिसेंबरला राज्यभरात नगरपरिषद नगरपंचायतीची मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे एमपीएससीचीही परीक्षा त्याच दिवशी असणार आहे. जिल्हा पातळीवर परीक्षेचे संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असेल. मात्र मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचारी सुद्धा मतमोजणीच्या कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मोठा अतिरिक्त ताण एकाच वेळी प्रशासनावर पडणार आहे. त्यामुळे 21 डिसेंबरला होणाऱ्या एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब बाबत एमपीएससी नेमका काय निर्णय घेणार आहे? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
MPSC Students Confusion : जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार, विद्यार्थीही संभ्रमात
दरम्यान, सुरुवातीला ही परीक्षा 9 नोव्हेंबरला होणार होती. मात्र त्यावेळी महाराष्ट्रातील काही भागात परिस्थिती निर्माण झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलत 21 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. मात्र आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी लांबल्याने आणि हि मतमोजणी एमपीएससी परीक्षेच्या दिवशीच होणार असल्याने त्याचा अतिरिक्त ताण जिल्हा प्रशासनावर असणार आहे.
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे काय परिणाम होणार?
-प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागतील..
-ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल..
-शिवाय सर्व स्ट्रॉंग रूम मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी चा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल..
-स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते.. ती प्रक्रिया रोज 21 नोव्हेंबर पर्यंत पार पाडावी लागेल.
-विधानसभेला साधारणपणे 288 ठिकाणी मतमोजणी असते, जवळपास तेवढेच मतमोजणी ठिकाण नगर परिषद निवडणुकीत आहेत.. मात्र, लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे विधानसभेची मतमोजणी वोटिंग नंतर लगेच एक किंवा दोन दिवसात होते..
-म्हणजे आज मतमोजणी समोर ढकलली गेली, तर विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी एवढी प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा कामी लागेल.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

























