एक्स्प्लोर

सदाभाऊ 7 वा. बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे

सोलापूर: अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासाच्या आत पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत. राज्यभरात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळी 7 वाजता सदाभाऊ खोत शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. पंढरपूर तालुक्यातील सरकवली, ओझेवाडी या गावांची सदाभाऊंनी पाहणी केली. अवकाळी पावसात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच घरांची पडझड झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. सदाभाऊ 7 वा. बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे काल सोलापूर जिल्ह्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड परिसराला अवकाळीने झोडपलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत पहाटेच पंढरपुरात दाखल झाले. सदाभाऊ यांच्यासोबत कृषी, महसूलसह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली. अर्ध्या तासांच्या गारपीटीमुळे द्राक्षे आणि डाळिंबाचे अतोनात नुकसान झालं आहे. सरकवली येथील प्रदीप घुले यांची फळाला आलेली 7 एकर द्राक्षाची बाग उद्ध्वस्त झाली असून, झाडावरील द्राक्षांचे घड बागेत पडले आहेत. सदाभाऊ 7 वा. बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे अनेक द्राक्षांची झाडे आडवी झाली असून झाडावर असलेले द्राक्ष मणी गारांच्या तडाख्याने फुटल्याने एका रात्रीत हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे . ही 7 एकर बाग फळावर येईपर्यंत घुले यांनी एकरी लाखभर रुपयांप्रमाणे खर्च केला होता. आता बेदाणे आणि द्राक्षातून 15 दिवसांत त्यांना एकरी 4 लाखाचे उत्पन्न अपेक्षित होतं. मात्र आता होतं नव्हतं सगळं गेलं. ओझेवाडी येथील मोहन क्षीरसागर यांनी  डाळिंबाची बाग लावली होती. कालपर्यंत 10 लाखाचे एकरी उप्तन्न मिळण्याची आशा असलेले क्षीरसागर यांच्या बागेला गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. सदाभाऊ 7 वा. बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे दरम्यान पंढरपूर - मंगळवेढ्याचे काँग्रेस आमदार भारत भालके यांनाही या गारपिटीचा फटका बसला असून त्यांच्या द्राक्षे बागेचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. सदाभाऊ खोत यांनी या सर्व ठिकाणाला भेटी देऊन पाहणी करीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या मोठ्या नुकसानीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांशी खोत यांनी शिवारात आणि ग्रामपंचायत कार्यालयात संवाद साधला.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget