Manoj Jarange Patil : धन्या मुंडे म्हणत मनोज जरांगेंचा कॅबिनेट मंत्र्यांला इशारा; तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही
धन्या मुंडे तुझ्या गुंडांना शांत कर, हे थांबल नाही तर तुझी मस्ती जिरवल्या शिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.
Manoj Jarange on Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हा मनोज जरांगे भीत नसतो. तुझ्या गुंडांना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारीनंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही. तुझी टोळी थांबाव, ही धमकी नाही, तर तुला सावध करतोय. हे थांबल नाही तर तुझी मस्ती जिरवल्या शिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तोफ डागली आहे.
आम्ही कधीच तुझ्या जातीवर बोललो नाही, आम्ही कायम गुंडावर बोललोय आणि बोलत राहणार. राज्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला म्हणून मराठा शांत आहे. देशमुख कुटुंबावर कोणी बोलेल तर त्या गुंडांचा बंदोबस्त आम्ही करू. धाराशिवमध्ये पोलीस अधिकारी यांच्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. मुख्यमंत्री साहेब सरकार म्हणून आम्ही तुमच्यावर थुंकतो. बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करा, त्यांना सरकारी वकील द्या, जन्म ठेप होत नाही तोपर्यंत त्याची सुटका होता कामा नये. सर्व आमदारांनी या लेकीला न्याय द्या, हे सुटले तर तुमच्या मागे मी लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले.
अजित दादा, देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा हा प्रताप
अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा हा प्रताप आहे. केजमध्ये ही पोरीला मारून टाकले, धण्या मुंडे यांच्या कार्यकर्ते यांचे हे प्रताप आहेत. मी कधी त्यांचं नाव घेत नाही. मात्र धनंजय देशमुख यांना धमकी दिल्यानंतर मी नाव घेतलं. यांनी टोळ्या पाळल्या आहेत. यांनी लोकं मारायचं ठरवलं आहे. यांना जातीशी देणेघेणे नाही. कोणावर हल्ला करायची गरज नाही, मात्र प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत बसायचं नाही. तुमच्या कुटुंबाचे तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे. यांना थांबवायचं नसेल तर आपला ना इलाज आहे, हे फक्त मुटभर आहेत. देशमुख कुटुंब यांचं दुःख जाणार नाही, याची जाण आम्हला आहे. मात्र तुम्हाला धीर धरावा लागेल.
सगळ्या मराठ्यांनी एकजीव व्हा, मागे हटलो तर आपल्या लेकरांचे तुकडे पडतील. काळ धावून आला आहे, काळ संपवायचा असेत तर धनंजय मुंडे त्याचं पाप झकण्यासाठी ओबीसींचे पांघरून घेत आहे. यात ओबीसी चा काय संबंध आहे? वंजारी, धनगर, दलित कोणाला बोललो नाही, गुंडांना बोलायचं नाही का? धनंजय मुंडे तुमच्या घरात कोणी मेल तर प्रतीमोर्चे काढायचे का? तुम्ही त्रास देत राहिलात तर मराठ्यांना उठाव करावा लागेल असेही मनोज जरांगे म्हणाले.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणी
नांदेडचा बिहार होऊ द्याचा नाही. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना करू नये, अशी मागणी नांदेड येथील सकल मराठा समाजाने केली आहे. नांदेडमध्ये आज सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. 18 तारखेला नांदेडमध्ये जन आक्रोश मोर्चा होणार आहे. वाल्मिक कराड यांचावर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. तर वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट करून त्यांची चौकशी करावी, वाल्मिक कराड यांचा बॉस धनंजय मुंडे आहेत. तसेच मुंडे यांनी नैतिक जवाबदारी समजून राजीनामा द्यावा, अशी सर्व समजा बांधवांची मागणी असल्याचे यावेळी सांगितले.
हे ही वाचा