महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी पाच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर
अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

मुंबई : महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून पाच अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे संयुक्त जाहीर प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगांवकर तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे.
तरी या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान
पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या जयंत आससगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकडून देखील आज पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला.
नागपूरचे महापौर संदीप जोशी ह्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. . ह्या जागेवर नुकतीच भाजपची टर्म प्राध्यापक अनिल सोले ह्यांनी पूर्ण केली होती आणि ते ही उमेदवारीच्या रेसमध्ये होते. ते जेव्हा इतर नेत्यांबरोबर पोहचले नाही तेव्हा ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. पण शेवटच्या क्षणी जोशी फॉर्म भरत असताना ते पोहचले आणि भाजपच्याही अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना हुश्श झाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
