Nagpur : 2050 पर्यंत नागपुरात नेट झिरो बिल्डिंग; झिरो कार्बन कृती आराखडा, काय आहे हा प्लॅन
झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर प्रकल्प वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे सादर करण्यात आला असून शहरातील इमारती नेट झिरो बिल्डिंग बनविण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी आणि मनपा शहरात सोबत काम करत आहे.
Nagpur News : शहरात 2018 ते2020 या कालावधीत राबविण्यात आल्या झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर (ZCBA)(Zero Carbon Building Accelerator) प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रकल्पादरम्यान नागपूर स्मार्ट सिटी तर्फे (Nagpur Smart City) शहरासाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित करण्यात आले होते. या मार्गदर्शक तत्वामुळे, शहरातील नागरिकांना उत्तम हवामान आणि ऊर्जा कार्यक्षम घरे मिळण्यात मदत होईल. यासाठी एक रोडमॅप सुद्धा तयार केला जात असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. वर्ष 2050 पर्यंत शहरातील इमारती नेट झिरो बिल्डिंग बनतील अशा आशावादही उपस्थितांनी व्यक्त केला.
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (nagpur smart and sustainable city development corporation), नागपूर महानगरपालिका, जागतिक संसाधन संस्था (WRI) आणि ICLEI-दक्षिण आशिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर' (Zero Carbon Building Accelerator) या प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी नागपूर स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यात यासंदर्भात सुरू असलेल्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे प्रामुख्याने उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी या प्रकल्पासठी खासगी व शासकिय क्षेत्रांना मिळून काम करण्याचे आवाहन केले. यावेळी ICLEI दक्षिण आशिया, WRI, आणि इला ग्रीन बील्डींग अँन्ड ईन्फास्ट्क्चर कन्टसल्न्टंसीचेचे प्रतिनिधी यांनी ZCB रोडमॅपसाठी तयार केलेल्या माहितीचे सादरीकरण केले. यावेळी मनपा, नागपूर स्मार्ट सिटी आणि अन्य विभागाचे तज्ञ उपस्थित होते.
कृती आराखडा
झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर कार्यक्रम वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) द्वारे लाँच करण्यात आला असून याला ग्लोबल एंवीरोन्मेन्ट फॅसिलिटी द्वारे सहकार्य प्राप्त झाले आहे. झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर, दक्षिण आशियाचा प्रादेशिक भागीदार आहे आणि नागपूर स्मार्ट सिटी तसेच मनपा सोबत काम करत आहे. यातून नागपूरसाठी झिरो कार्बन बिल्डिंग कृती आराखडा विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
'स्थानिक हवामान परिस्थिती आणि पारंपारिक पद्धती लक्षात घेऊन ZCB साठी मार्गदर्शक तत्व तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ऊर्जा कार्यक्षम व उत्तम हवामान असलेले घरे मिळणार असल्याचा आशावाद स्मार्टी सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी व्यक्त केला.
झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर प्रकल्पाबद्दल...
वातावरण बदलामुळे (Climate Change) पृथ्वीची होणारी हानी थांबविण्यासाठी जगभरातील अनेक देशातील विविध शहरांतील शासकीय संस्थांनी पुढाकार घेतला आहे. 2050 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे लक्ष्य ठेवून विविध पॉलिसीद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे काम करत आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेनेही नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासोबत यात सहभाग नोंदविला आहे. 2021 च्या सुरुवातीला तुर्की आणि कोलंबियामध्ये झिरो कार्बन बिल्डिंग एक्सलेटर लाँच केले गेले. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय आणि स्थानिक तज्ञ भागधारकांसोबत काम करत असून बिल्डिंग सेक्टर डिकार्बोनाइज करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हा प्रकल्प साधने, हायटेक पद्धती आणि आर्थिक उपायांचा लाभ घेऊन बिल्डिंग इफिशियन्सी एक्सीलरेटर नेटवर्कवर काम करुन हे उद्दिष्ट साधण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
ही बातमी देखील वाचा