मोठी बातमी! मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर उडी घेत युवकाचं आंदोलन, इंकलाब जिंदाबादच्या घोषणा
मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर (Mantralaya safety net) एका युवकाने उडी घेत आंदोलन सुरु केलं आहे. युवकानं सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी देखील जाळीवर उड्या घेत त्या युवकाला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई : मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवर (Mantralaya safety net) एका युवकाने उडी घेत आंदोलन सुरु केलं आहे. युवकानं सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी देखील जाळीवर उड्या घेत त्या युवकाला ताब्यात घेतलं आहे. इंकलाब जिंदाबादच्या घोषणा हा युवक देत आहे. यावेळी युवकाच्या हातात इंकलाब जिंदाबाद लिहलेली पत्रके होती. ही पत्रके देखील परिसरात फेकण्यात आली आहेत.
मंत्रालयात पुन्हा एकदा सुरक्षा जाळीवर उडी घेत एका युवकाने आंदोलन केलं आहे. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर एकच खळबळ उडाली. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलकाला ताब्यात घेतलं. मंत्रालयात तरुणाने कोणत्या कारणासाठी आंदोलन केलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल
आंदोलन करणाऱ्या युवकानं सातव्या मजल्यावरुन सुरक्षा जाळीवर उडी घेतली आहे. महसूल खात्यासंदर्भात तक्रार देखील या युवकाने आणली होती. युवकाने जाळीवर उडी घेतल्यानंतर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील याठिकाणी दाखल झाला. अधिकारी देखील दाखल झाले होते. दरम्यान, मंत्रालयात वारंवार अशा घटना घडत आहेत. संपूर्ण मंत्रालयाचा जाळी लावली आहे. कोणत्या प्रकारचा अनर्थ घडू नये यासाठी सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा वेळी कोणताहगी अनर्थ टळू नये म्हणून मंत्रालयात संरक्षण जाळी लावण्यात आली आहे. तरीदेखील या जाळीवर उडी घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशीच आजही घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























