एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानच्या गोळीबारात धुळे जिल्ह्यातील जवान शहीद
जम्मू-काश्मीर मधील सुंदरबनी सेक्टर इथे झालेल्या गोळीबारात ही घटना घडली.
श्रीनगर : पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना धु़ळे जिल्ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाणे यांना वीरमरण आलं आहे. ते केवळ 28 वर्षांचे होते. जम्मू-काश्मीर मधील सुंदरबनी सेक्टर इथे झालेल्या गोळीबारात ही घटना घडली.
सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात योगेश भदाणे शहीद झाले. 28 वर्षांचे योगेश भदाणे धुळे जिल्ह्यातल्या खलाने गावातले रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम आहेत.
योगेश भदाणे यांच्या कुटुंबात त्यांचे दोघेही मेहुणे लष्करात आहेत. योगेश यांचा विवाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता. या घटनेने धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. योगेश शहीद झाल्याची घटना ऐकून त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
भारत
करमणूक
Advertisement