एक्स्प्लोर
यवतमाळ पोलिसांची सायकलवरुन पेट्रोलिंग
सायकल खरेदीसाठी जिल्हा पोलीस दलाला 2 लाख 95 हजार रुपये प्राप्त झाले असून टप्याटप्याने पोलीस स्टेशनच्या गरजेनुसार आणि गर्दी लक्षात घेता या सायकल बहुतांश पोलिसांना देण्यात येणार आहे.
यवतमाळ : सण-उत्सव आणि गर्दीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांशी पोलिसांसोबत संपर्क वाढवा यासाठी यवतमाळ पोलिस दलात सायकल दाखल झाली आहे. यवतमाळ पोलीसांनी आता सायकलवरुन पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे.
गल्ली-बोळात पेट्रोलिंग करताना सुलभ व्हावे आणि वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी सायकलचा वापर करण्यात येतो आहे. शिवाय, पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठीही सायकलचा उपयोग होणार आहे. सध्या नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांची गर्दी असते. अशा ठिकाणी जाण्यासाठी सायकल अधिक बरी पडते.
यवतमाळच्या पोलिस दलात सध्या 30 सायकल दाखल करण्यात आल्या आहेत. या सायकल यवतमाळच्या शहर आणि वडगाव पोलीस ठाण्याबरोबरच वणी, पांढरकवडा, पुसद, उमरखेडमध्येही देण्यात आल्या आहेत. या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या सायकल खरेदी करण्यात आल्या आहेत.
सायकल खरेदीसाठी जिल्हा पोलीस दलाला 2 लाख 95 हजार रुपये प्राप्त झाले असून टप्याटप्याने पोलीस स्टेशनच्या गरजेनुसार आणि गर्दी लक्षात घेता या सायकल बहुतांश पोलिसांना देण्यात येणार आहे.
सायकलवरुन पेट्रोलिंगचा आणखी एक फायदा म्हणजे, इंधन बचतीसोबत प्रदूषणमुक्त पेट्रोलिंग होईल. शिवाय, नागरिकांशीही संवाद वाढण्यास मदत होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement