Yavatmal : यवतमाळच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग, विद्यार्थ्याच्या आईनेच केली तक्रार
Yavatmal Medical Collage News: विद्यार्थ्याची रॅगिंग (Student Raging) केल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या आईनेच महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे केली आहे. या घटनेने महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
Yavatmal Medical Collage News: यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Vasantrao Naik Govt Medical Collage) पदव्युत्तर अभ्यासक्रमाला शिक्षण घेणाऱ्या ऐका विद्यार्थ्याची रॅगिंग (Student Raging) केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याची घेण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या आईनेच महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे केली आहे. या घटनेने महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
नागपूर येथील हा विद्यार्थी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयत पदव्युत्तर पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. 15 दिवसांपूर्वी तो याठिकाणी आला आहे. दरम्यानच्या काळात काही विद्यार्थ्यांनी त्याची रॅगिंग घेतली. त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी तक्रार विद्यार्थ्यांच्या आईने महाविद्यालयाला प्रशासनाला दिली.
विद्यार्थ्याच्या आईने आपल्या मुलाची रॅगिंग झाल्याची तक्रार अधिष्ठाता मिलिंद फुलपाटील यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून मुलाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. त्या अनुषंगाने आता महाविद्यालय प्रशासन आता चौकशी समिती गठित करून चौकशीला सुरुवात करणार आहे. चौकशीअंतीच नेमकं काय सत्य आहे हे उघड होणार आहे.
वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून एका कनिष्ठ वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात आहे. या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमध्ये देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. चौकशीअंती या प्रकरणातील सत्यता बाहेर येणारच आहे. मात्र निर्दोष विद्यार्थ्यांना या प्रकरणी विनाकारण त्रास होऊ नये, अशी चर्चा महाविद्यालयातील डॉक्टरांमध्ये सुरू आहे. अर्थातच या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर नियमांनुसार कारवाई व्हायलाच हवी, असं मत देखील काहींनी व्यक्त केलं आहे.
गेल्या वर्षी झाली होती विद्यार्थ्याची हत्या
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याच महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं होतं. जन्माष्टमी कार्यक्रमाच्या निमित्ताने काही बाहेरच्या तरुणांनी महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश केला आणि त्यांनी मुलींच्या हॉस्टेलसमोर लघुशंका केली होती. त्यावेळी डॉ.अशोक पाल आणि त्यांच्या मित्रांनी त्या तरुणांना हटकले. याच प्रकरणातून डॉ. अशोक यांची हत्या झाल्याचं समोर आलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या
यवतमाळमध्ये शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या, शासकीय मेडिकल कॉलेजमधील खळबळजनक घटना
वादातून कॉलेजबाहेरच्या तरुणांनी डॉक्टर विद्यार्थ्याला भोसकलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना