एक्स्प्लोर

वादातून कॉलेजबाहेरच्या तरुणांनी डॉक्टर विद्यार्थ्याला भोसकलं; यवतमाळमधील धक्कादायक घटना

Yavatmal Doctor Murder Case : मुलींच्या हॉस्टेलसमोर लघुशंका करताना हटकल्याने बाहेरच्या तरुणांनी डॉ. अशोक पाल यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. डॉ. अशोक पाल असे मृतक डॉक्टरचे नाव असून तो MBBS च्या फायनल इयरचा विद्यार्थी होता. ही हत्या वादातून झाली असून कॉलेजबाहेरच्या तरुणांनी धारदार शस्त्राने ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. 

जन्माष्ठमी कार्यक्रमाच्या निमित्ताने काही बाहेरच्या तरुणांनी महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश केला आणि त्यांनी मुलींच्या हॉस्टेलसमोर लघुशंका केली होती. त्यावेळी डॉ.अशोक पाल आणि त्यांच्या मित्रांनी त्या तरुणांना हटकले. याच प्रकरणातून डॉ. अशोक यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

शासकीय महाविद्यालयातील एका डॉक्टर विद्यार्थ्याची हत्या कशी झाली, बाहेरच्या लोकांना महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश कसा मिळतो असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. शिकावू डॉक्टरांनी महाविद्यालयाचे गेट बंद केलं असून आणि डॉ. अशोक पाल यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले आहे. त्यामुळे या ठिकाणची आरोग्य यंत्रणा कोलमडली असून कुणालाही मेडिकल परिसरात प्रवेश मिळाला नाही. या आंदोलनामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेरच ताटकळत थांबावं लागल्याचं चित्र होतं.

 या हत्या प्रकरणांतील आरोपींना अटक करावी तसेच मेडिकल कॉलेजच्या डीन यांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिकावू आंदोलक डॉक्टरांनी केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा प्रतिनिधिक पुतळा मेडिकल परिसरात जाळून निषेध केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
बच्चू कडू म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, उपमुख्यमंत्री म्हणाले आमदारांना काही त्रास असेल तर दूर करु
बच्चू कडू म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, उपमुख्यमंत्री म्हणाले आमदारांना काही त्रास असेल तर दूर करु
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
Maharashtra Goverment Cabinet Decision: मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय
Sameer Bhujbal: भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण.....,समीर भुजबळांचा गौप्यस्फोट
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून आमदाराच्या राजीनाम्याची मागणी; नव्या चेहऱ्याला संधी
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
15 दिवसांत माफी मागा, अन्यथा...; आमदार संजय गायकवाडांना भाजप नेत्याकडून 100 कोटींची नोटीस, वाद चिघळला
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
मिरजमध्ये टर्न घेताना कार थेट घरात घुसली, कौटुंबिक साहित्याचे नुकसान; पोलिसांकडून पंचनामा
Embed widget