Bhiwandi Murder: खळबळजनक! कामाच्या वादातून सहकाऱ्याची गळा चिरून निर्घृण हत्या
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला.
![Bhiwandi Murder: खळबळजनक! कामाच्या वादातून सहकाऱ्याची गळा चिरून निर्घृण हत्या Brutal murder of a co-worker by slitting his throat in a work dispute; The accused absconded Bhiwandi Murder: खळबळजनक! कामाच्या वादातून सहकाऱ्याची गळा चिरून निर्घृण हत्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/01/b320b036eb220fd097cdc668496eb6c6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhiwandi Crime: एकत्र काम करणाऱ्या दोघा सहकारी कामगारात वाद झाला. या वादातून एकाने कटरच्या साहाय्याने सहकाऱ्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली. ही घटना भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सिद्धार्थ इंटरप्राइजेस लॅमिनेशन पेपर गोदामात घडली. राजू क्यातम (वय, 18) असे हत्या झालेल्या सहकारी तरुणाचे नाव आहे. तर, मोहम्मद असिफ अन्सारी (वय 21) असे हत्या करून फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात (Narpoli Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला.
भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचात हद्दीत सिद्धार्थ इंटरप्राइजेस नावाने लॅमिनेशन पेपरचे गोदाम आहे. या गोदाम दोघेही गेल्या एक वर्षापासून कट रेडियम वापरून गोडाऊनमध्ये काम करत होते. काम करत असतानाच कामाचे श्रेय घेणे, कोण चांगले काम करतो. याबद्दलयावरून दोघांमध्ये एक महिन्यापासून वाद सुरू होते. विशेष म्हणजे, त्या दोघांच्या भांडणात ते इतरांपेक्षा कमी काम करीत होते. तरीही त्याला चांगला पगार मिळत होता. त्यातच आज दुपारी दीडच्या सुमारास याच मुद्द्यावरून त्यांच्यात गोडाऊनमध्ये भांडण झाले. त्यावेळी आरोपी अन्सारीने कटरने राजूचा गळा चिरला. त्यांनतर घटनास्थळा वरून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत राजुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना करून अन्सारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तर, आरोपीच्या शोधात पोलिसांची तीन पथके रवाना केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी दिली.
नवी मुंबईत गेल्या आठवड्यात पैसे उधार देत नाही म्हणून एका महिलेची हत्या करण्यात आली. दरम्यान मृत महिलेने आत्महत्या केल्याचे भासवून आरोपीने पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची सुरुवातीला नोंदही केली होती. मात्र, ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा आरोपी मृत महिलेच्या घरी जाऊन आल्याची पोलिसांना तक्रार मिळाली. यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)