एक्स्प्लोर
यवतमाळच्या दारव्हा गावातला महामार्ग शिवसैनिकांनी उकरला, ट्रॅक्टरच्या सहाय्यानं संपूर्ण रस्ता खोदला
दिग्रस ते मूर्तिजापूर दरम्यान होत असलेले हे रस्त्याचे काम सिमेंटमध्ये करावे अन्यथा रस्ता होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.
यवतमाळ : यवतमाळमधील दिग्रस ते मूर्तिजापूर दरम्यान होत असलेल्या रस्त्याचे काम दारव्हा गावानजीक शिवसैनिकांनी बंद पाडले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चौपदरीकरण सुरु असलेला रस्ता शिवसैनिकांनी उकरुन टाकला आहे.
महामार्गाची कामं इतर ठिकाणी सिमेंटमध्ये होत असताना यवतमाळ जिल्ह्यात मात्र डांबराच्या साहाय्यानं रस्ता तयार केला जात असल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी रस्ताच खोदला आहे. शिवसैनिकांनी सुरू असलेल्या माती व मुरुमीकरणाच्या कामावर चक्क ट्रॅक्टर वरील रोटावेटरने रस्ता उखडला आणि चालू असलेले काम बंद पाडले आहे.
VIDEO | यवतमाळ-दारव्हा गावातला महामार्ग शिवसैनिकांनी खोदला, सिमेंटऐवजी डांबर वापरलं जात असल्याचा आरोप | एबीपी माझा
दिग्रस ते मूर्तिजापूर दरम्यान होत असलेले हे रस्त्याचे काम सिमेंटमध्ये करावे अन्यथा रस्ता होऊ देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement