एक्स्प्लोर

World Suicide Prevention Day | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!

World Suicide Prevention Day 2020 | आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. याच निमित्ताने गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. देशात मागील वर्षात एक लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

औरंगाबाद : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आत्महत्या हा विषय अधिकच चर्चिला गेला. आत्महत्या खरोखरच देशासमोरचं नवं संकट म्हणून समोर येतंय का? वाढत्या आत्महत्येचे कारणं काय आहेत? अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. याच निमित्ताने गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. देशात मागील वर्षात एक लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्या पैकी 13.6 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. तसंच आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल 40 पट जास्त असते असं एका अभ्यासात आढळून आलं आहे.

मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करुन आपलं जीवन संपवतात. म्हणजे जगात दर 40 सेकंदाला एक जण आत्महत्या करत होतो. यावरुन आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य वाढत आहे. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे.

World Suicide Prevention Day | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!

2019 मध्ये आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची संख्या 15.4 टक्के आहे. महाराष्ट्रात 13.6 टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू 9.7 टक्के, पश्चिम बंगाल 9.1 टक्के, मध्यप्रदेश 9 टक्के आणि कर्नाटकात 8.1 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहेत. या पाच राज्यात मिळून 49.5 आत्महत्या झाल्या आहेत.

World Suicide Prevention Day | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!

आत्महत्येची प्रमुख कारणे - कौटुंबिक आणि वैवाहिक कारणांमुळे 37.9 टक्के आत्महत्या झाल्याचं समोर - आजारपणातून 17.1 टक्के आत्महत्या - व्यसनाधीनता 5.6 टक्के आत्महत्या - प्रेमभंगातून 4.5 टक्के आत्महत्या - कर्जबाजारीपणामुळे 4.2 टक्के आत्महत्या

देशातल्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरात म्हणजेच मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु या शहरांमध्ये 36.6 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

World Suicide Prevention Day | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर!

आत्महत्येचे वय - 18 पेक्षा कमी वर्षे वय - 9612 म्हणजेच 6.9 टक्के - 18 ते 30 वय - 48 हजार 774 म्हणजे 35.1 टक्के - 30 ते 45 वयोगटात 44 हजार 287 म्हणजे 31.8 टक्के

देशात 92 हजार 757 म्हणजे 66.7 टक्के विवाहितांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर 32 हजार 852 म्हणजेच 23.6 टक्के अविवाहितांनी आत्महत्या केली आहे.

एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या 92 हजार 083 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, याचं प्रमाण 66.2 टक्के आहे. तर एक लाख ते पाच लाख आर्थिक उत्पन्न असलेल्या देशातील 41 हजार 197 जणांनी आत्महत्या केली आहे, त्याचं प्रमाण हे 29.6 टक्के आहे. या अभ्यासानुसार आत्महत्या हे देशासमोरचं नवं संकट म्हणून उभं राहत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Beed : संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण; 50 दिवसांत काय झालं?Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणीABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaha Kumbh 2025 ; चेंगराचेंगरी ते अमृतस्नान; प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अपडेट्स Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget