एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

World Spices Council 2023 : नवी मुंबईत होणार जागतिक मसाले परिषद, 80 देश होणार सहभागी

नवी मुंबईत (Navi Mumbai) 14 व्या जागतिक मसाले परिषदेचं (World Spices Council 2023) आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 80 देश सहभागी होणार आहेत.

World Spices Council 2023 : नवी मुंबईत (Navi Mumbai) 14 व्या जागतिक मसाले परिषदेचं (World Spices Council 2023) आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान ही मसाले परिषद होणार आहे. यंदाच्या जागतिक मसाले परिषदेत स्टेट पॅव्हिलियन्स आणि या उद्योगातील अग्रणींकडून ‘टेक टॉक्स’ अशा अनेक नव्या वैशिष्ट्यांचा पहिल्यांदाच समावेश असणार आहे. ही परिषद मसाल्याचे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्याचे, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि मसाल्याच्या व्यापारात सर्वोत्तम पद्धती विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करेल असे मत भारतीय मसाले बोर्डाचे सचिव डी. सथियन यांनी व्यक्त केले.
 
विविध व्यापार आणि निर्यात मंचांच्या सहकार्याने आयोजित केलेली ही जागतिक मसाले परिषद, मसाले क्षेत्रासाठीच्या सर्वात मोठ्या  व्यावसायिक व्यासपीठांपैकी एक आहे. या परिषदेत धोरणकर्ते, नियामक अधिकारी, मसाले व्यापार संघटना, सरकारी अधिकारी तसेच जी 20 देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ  सहभागी होणार आहेत. या परिषदेत जागतिक मसाले उद्योगातील सर्व हितधारक एक छत्राखाली येणार असल्याची माहिती डी. सथियन यांनी दिली.

मसाल्यांची बाजारपेठ असलेला भारत आघाडीचा देश

मसाल्यांच्या बाजारपेठेमध्ये भारत आघाडीचा देश असून, या क्षेत्रामधील अतुलनीय विविधता असलेला देश आहे. उत्पादन क्षेत्रातील शेतकरीच नव्हे तर मसाला क्षेत्र देखील देशाच्या परकीय चलनात महत्त्वाचे योगदान देत आहे. जागतिक मसाले परिषद 2023 ही मसाल्याचे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी या क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्याचे, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे आणि मसाल्याच्या व्यापारात सर्वोत्तम पद्धती विकसित करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करेल असे सथियन म्हणाले. 

80 देशांनी केली नोंदणी 

दरम्यान, या जागतिक मसाले परिषदेत 800 ते 1000 प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. सुमारे 80 देशांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. आगामी काळात आणखी जास्त आंतरराष्ट्रीय नोंदण्या अपेक्षित आहेत. त्यामुळे या परिषदेत जगभरातील देशांचा सहभाग होईल. जागतिक मसाले परिषद 2023 ही कोविड -19 पश्चात मसाले उद्योगातील सध्याचा कल, उदयोन्मुख आव्हाने आणि यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी हितधारकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात  मसाल्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यावसायिक सत्रे तसेच दुसऱ्या दिवशी आयातदारांसोबत रिव्हर्स बायर सेलर मीट (RBSM) आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या प्रतिष्ठित G20 अध्यक्षतेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत 15-17 सप्टेंबर 2023 दरम्यान 14व्या  जागतिक मसाले परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे जागतिक मसाला व्यापारातील नवनवीन संधी खुल्या होतील. 1990 मध्ये स्थापन जागतिक मसाला परिषदेची स्थापना झाली आहे. या क्षेत्रातील जागतिक दृष्टीकोन एकत्र आणण्याबरोबरच मसाल्यांच्या व्यापारात भारताचे नेतृत्व टिकवून ठेवण्यात यशस्वीपणे योगदान देऊ शकते.

जागतिक मसाले परिषद 2023 ची वैशिष्ट्ये

जागतिक मसाले परिषद 2023 ची संकल्पना, "व्हीजन-2030 : S-P-I-C-E-S (सस्टेनेबिलिटी, प्रॉडक्टिव्हिटी, इनोवेशन, कोलॅबरेशन, एक्सेलन्स ॲन्ड सेफ्टी)" म्हणजेच  शाश्वतता, उत्पादकता, नवोन्मेष, सहकार्य, उत्कृष्टता आणि सुरक्षितता अशी आहे.

जागतिक मसाले परिषद 2023 च्या सत्रांमध्ये पिके आणि बाजार अंदाज व  कल; अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके आणि प्रमाणपत्रे; औषधी, पोषण संबंधी, अभिनव  आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उत्पादनांमध्ये मसाल्यांना वाव आणि संधी; चव वाढवणारे मसाले आणि अन्नपदार्थ; रेडी टू यूझ /कुक / ड्रिंक उत्पादने; स्पाईस ऑइल आणि ओलिओरेसिनसाठी कल आणि संधी, ग्राहकांचे प्राधान्य आणि उदयोन्मुख कल; पुरवठा साखळी व्यवस्थापनातील विश्वासार्हता आणि अखंडता, पॅकेजिंगसंबंधी आंतरराष्ट्रीय आवश्यकता, जागतिक मसाला बाजारपेठेतील कल आणि संधी यावर चर्चा होईल.

जागतिक मसाले परिषद 2023 चा भाग म्हणून मसाले आणि मूल्यवर्धित मसाले उत्पादनांच्या विविध श्रेणी तसेच मसाले उद्योगातील अभिनव तंत्रज्ञान आणि उपाय अधोरेखित करणारे प्रदर्शन देखील आयोजित केले आहे. टेक टॉक, नवीन उत्पादनाचे उद्घाटन आणि कुकरी शो ची सत्रे देखील या निमित्ताने होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Benefits of Spices : हळद, आलं, काळी मिरीसह 'हे' मसाले औषधी; कोणत्या आजारांवर गुणकारी? जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget