एक्स्प्लोर

शेतात क्वारंटाईन असलेल्या मजुरांना उपसरपंचासह ग्रामस्थांकडून मारहाण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळं सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणात आपल्या गावात परतत आहेत. मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं इथून आलेल्या लोकांना गावात व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत.

हिंगोली : कोरोनामुळं घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे हाल होत आहेत. अशात मुंबई, पुणे अशा महानगरात गुजराण करणारी ही लोकं 'गड्या आपला गाव बरा' म्हणत गावाकडं पोहोचत आहेत. मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं इथून आलेल्या लोकांना गावात व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. आता हिंगोलीतील वसमत तालुक्यात असाच एक प्रकार समोर आला आहे.
वसमतमधील हट्टा येथे मुंबई येथून आपल्या गावी परतलेले काही कुटुंब आपल्या स्वतःच्या शेतामध्ये क्वारंटाईन म्हणून राहत होते. यातील दोघे जण रस्त्यावर येऊन बसल्याने त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या दोन ग्रामस्थांनी 'शेतात जाऊन बसा, तुम्ही असे कसे फिरत आहेत' असे म्हणून पुढे निघून गेले होते. यावेळी त्यांना या शेतात थांबलेल्या ग्रामस्थांनी अडवून मारहाण केली. त्यामुळे त्या दोघांनी गावात येऊन ही बाब ग्रामस्थांना सांगितल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी शेतात धाव घेऊन शेतात थांबलेल्या त्या कुटुंबाला मारहाण केली.
यामध्ये असलेल्या एका गरोदर महिलेला देखील मारहान केली असल्याची माहिती आहे. ही घटना काल दुपारी अडीचच्या सुमारास घडली. परजिल्ह्यात कामासाठी गेलेली अशी कुटुंब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळं सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणात आपल्या गावात परतत आहेत. हट्टा येथील अनेक कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त गेली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली.
आरोग्य तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे कुटुंब गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात गेल्या 14 दिवसांपासून राहत होते. त्यांचा काल 14 दिवसांचा कालावधी देखील पूर्ण झाला होता.
क्वारंटाईन केलेल्या एका गरोदर महिलेला मारहाण केल्याने सदर महिला रस्त्यावर पडली होती. या घटनेने हट्टा येथे एकच खळबळ उडाली होती. महिलेच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा उपसरपंचासह अन्य आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सध्या परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Embed widget