एक्स्प्लोर

खर्च  1 हजार कोटी, वसुली 3 हजार कोटी; मुंबईत अतिरिक्त टोल वसुली, सरकारची सभागृहात कबुली

मुंबईतल्या 55 उड्डाणपुलासाठी खर्च  1 हजार 259.38 कोटी झाला होता. 2026 पर्यंत 3 हजार 272 कोटी वसूल होणार आहे.

नागपूर  रस्त्यांची दूरवस्था असतानाही टोलवसुली (Toll)  सुरू असल्याची कबुली सरकारने आज विधानसभेत दिली आहे, तसेच  राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या भूमिकेला राज्य सरकारने दुजोरा दिला आहे.  तसेच मुंबई अतिरिक्त टोल वसुली (Mumbai Toll)  सुरू असल्याची देखील कबुली दिली आहे. रस्त्याचा खर्च वसूल झाला तरी नागरिकांकडून टोल आकारण्यात येतो. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह इतर विधीमंडळ सदस्यांनी सरकारकडे टोलसंदर्भात विचारणा केलेली होती. टोलवसुलीचं उद्दिष्ट साध्य करुनही राज्यात टोलवसुली सुरु असल्याची कबुली सरकारने दिली आहे.

टोलवसुली  संदर्भात वेगवेगळ्या आमदारांनी राज्यात अनेक ठिकाणी सद्यस्थितीत टोल सुरू असून मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे. एवढच नाही तर रस्त्यांची दूरवस्था असल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे का असा सवाल  विचारला. यावर उत्तर देताना मंत्री दादा  भुसे यांनाी हे अंशत: खरे आहे असे उत्तर दिले. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ अंतर्गत एकूण दहा प्रकल्पवर टोल वसुली प्रगतीपथावर आहे.  निविदेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत रस्त्यांची आणि पुलांची देखभाल दुरुस्ती केली जाते असे उत्तर दिलं. 

मुंबईत अतिरिक्त टोल वसुली सुरू असल्याची सरकारची कबुली 

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या 55 पुलाचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या पाच टोल नाक्यांवर पुलांचा खर्च वसूल होऊनही अद्याप टोल वसुली सुरू असून त्यात दरवाढ करण्यात आली आहे का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला . त्यावर दादा भुसे यांनी उत्तर खरे आहे दिले.  म्हणजे मुंबई अतिरिक्त टोल वसुली सुरू आहे. मुंबईतल्या 55 उड्डाणपुलासाठी खर्च  1 हजार 259.38 कोटी झाला होता. 2026 पर्यंत 3 हजार 272 कोटी वसुल होणार आहे. म्हणजे या प्रश्नानंतरही टोलवसुली सुरूच राहणार आहे. 

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट

टोलच्या मुद्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज्याचे मंत्री दादा भुसे आणि सरकारचे अधिकारी यांच्यात टोलबाबत काही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले होते. 

अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केले जाते असा सवाल वाहनचालकांकडून  करण्यात आला.

हे ही वाचा :

Aarey: आरेतून प्रवास करताना आता खिशाला चाप; वाहनधारकांना भरावा लागणार 'ग्रीन टोल', वनविभाग निर्णय घेण्याच्या तयारीत

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget