एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार का?
31 जुलै ही विमा भरायची शेवटची तारीख असते पण त्याला मुदतवाढ मिळते असा शेतकऱ्यांचा अनुभव, यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वत: 'वेळेत प्रिमियम भरा, मुदतवाढ मिळणार नाही' असं सांगितलंय.
मुंबई : आजपासून 31 जुलैपर्यंत बँकामधून पीक विमा ऑनलाईन भरता येणार नाही, असं पत्रक केंद्रानं काढलं. मात्र शेतकऱ्यांना ऑफलाईन फॉर्म भरता येणार आहे. तसंच आपले सरकार, सेतू केंद्रांवर (CSC) ऑनलाईन विमा भरणं सुरुच राहील, असा पुनरुच्चारही केला. बँकांनी मुदतीच्या आत विम्याचा हफ्ता भरावा, मुदतवाढ मिळणार नाही असंही बजावलंय.
काळजी :- शेतकऱ्यांनी काळजी करु नये, ऑफलाईन फॉर्मचं 3.2.1 हे अपडेटेड वर्जन बँकांना देण्यात आलं आहे, त्यामुळे पीक विमा ऑफलाईन भरणं सोपं-सुकर आहे, असा दावा कृषी विभाग करतंय.
मात्र बँकेत तसंच सेतू केंद्रांवरच दृश्य वेगळं आहे. बँका आता ऑफलाईन अर्ज भरुन नंतर ऑनलाईन एन्ट्री करणार आहेत. शेतकऱ्यांनी आधार कार्ड नंबर, सातबारा, पेरणी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
''15 पानी ऑनलाईन फॉर्म भरायला गावात इंटरनेट तरी आहे का?''
चार दिवसात किती शेतकरी हे काम पूर्ण करु शकतील आणि विमा कवच मिळवू शकतील याबाबत शंका आहे. बीडसारख्या ठिकाणी 5-6 लाखांपेक्षा जास्त अर्ज येणं अपेक्षित असताना अंदाजे केवळ 50 हजार शेतकरीच विमा फॉर्म भरु शकलेत यावरुन हे काम किती मागे पडलंय याचा अंदाजा येऊ शकतो. संदर्भ :- नैसर्गिक आपत्ती, कीडरोगामुळे नुकसान झालं तर शेतकऱ्याला थोडातरी दिलासा मिळावा यासाठी पिक विम्याचा आग्रह केला जातो. खरीप हंगामातील नऊ पिकांना पंतप्रधान पिक विमा योजनेचं संरक्षण आहे. 2014-15 साली दुष्काळाची झळ बसलेल्या अनेक शेतकऱ्यांनी विम्याचे हफ्ते भरले आणि त्याचा त्यांना फायदाही झाला. काही जिल्ह्यात विम्यापोटी दोन-दोनशे कोटी रुपये आले. त्यामुळे गेली दोन-तीन वर्ष पीक विम्याबाबत जागरुकता वाढली. डिजीटलचा आग्रह धरणाऱ्या सरकारनं यंदा पीक विमा ऑनलाईन भरायचा निर्णय घेतला. त्यासाठी बँका तसंच ‘आपले सरकार’ सारख्या कॉमन सर्विस सेंटर्सचा पर्याय दिला. वीज नाही, इंटरनेट नाही, स्पीड नाही, रेंज नाही, कामाबाबतची अंगभूत उदासीनता अशा वातावरणात ऑनलाईनच काय, ऑफलाईन सुद्धा फॉर्म भरण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शेवटचे काही दिवस उरले तसं बँकेबाहेर रांगा गर्दी वाढू लागली, कामाची गती आणि इंटरनेटची गती मॅच झाल्यानं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संयमही संपला, त्यामुळेच बोरीसारख्या गावात दगडफेक, रास्ता रोकोसारख्या घटनाही घडल्या. 31 जुलै ही विमा भरायची शेवटची तारीख असते पण त्याला मुदतवाढ मिळते असा शेतकऱ्यांचा अनुभव, यंदा मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वत: 'वेळेत प्रिमियम भरा, मुदतवाढ मिळणार नाही' असं सांगितलंय. मात्र मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमार्गांवरील खड्डे वाढले, ट्राफिक जॅममुळे टोलवर वाहतूक तुंबली, तेव्हा बिना टोल जायला परवानगी दिली होती तो विचार शेतकऱ्यासाठी, ग्रामीण भागासाठी वापरणार का? ऑनलाईन विमा भरण्यात आलेल्या अनंत अडचणींमुळे जो वेळेचा अपव्यय झाला त्याचा विचार करत सरकार मुदतवाढ देईल का? पाहा व्हिडिओ :अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
ठाणे
Advertisement