एक्स्प्लोर
केंद्रात जाणार का? मुख्यमंत्र्यांचं उत्तर....
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र सामना हे युतीतील दुराव्यासाठीचं एक महत्त्वाचं कारण असल्याचं भाजप नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवलं आहे. मात्र त्याच 'सामना'बद्दल मुख्यमंत्र्यांना काय वाटतं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
दररोज सकाळी तुम्हाला सामना वृत्तपत्र वाचल्यानंतर काय वाटतं? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी 'सामना' वाचत नाही.
'इंडिया टुडे'च्या इंडिया कॉनक्लेव्ह 2017 या कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवसेनेसोबतच्या मतभेदाबाबत...
शिवसेनेसोबतच्या वाढत्या मतभेदाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, "माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे आमचे प्रेरणास्थान आहेत. वाजपेयींनी अनेक छोट्या-छोट्या पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवलं, मला तर एकाच पक्षाला सोबत घेऊन सरकार चालवायचं आहे.
केंद्रात जाणार का?
सध्या मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने, त्यांचं केंद्रातील पद रिक्त झालं आहे.
त्यावरुन फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "केंद्रीय मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना जास्त अधिकार असतात असं समजू नका. आम्हाला जी जबाबदारी मिळाली आहे, ती व्यवस्थित सांभाळून परिवर्तन घडवायचं आहे. केवळ आम्हाला काय जबाबदारी दिलीय ते महत्त्वाचं नाही. सध्या मी मुख्यमंत्री असलो, तरी मला खूप मोठी कामं करायची आहेत, अग्रक्रमाने येणारी कामं खूप आहेत. पुढील 2-3 वर्षात आम्ही महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलू शकू. पण मी पक्षाच एक सच्चा सैनिक आहे, पक्ष जे सांगेल ते स्वीकारेन"
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement