एक्स्प्लोर
पतीची आत्महत्या, नैराश्यातून पत्नीचाही दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न

बीड : गरीबी आणि पोटाच्या आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचं समजताच नैराश्यातून पत्नीने स्वत: विष घेऊन दोन मुलांना विष दिल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील होळ येथील ही घटना आहे. उपचारादरम्यान 3 महिन्याच्या बालिकेनेही प्राण सोडले. पत्नी आणि 4 वर्षीय बालक मृत्यूशी झुंज देत आहेत. होळ येथील पांडुरंग आश्रुबा घुगे (27) या तीन एकर शेती पिकवत असलेल्या तरुण शेतकऱ्याने गरीबीला कंटाळून आत्महत्या केली. ते दोन दिवसांपासून बेपत्ता होते. सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. पतीने आत्महत्या केल्याचं समजताच पत्नीनेही नैराश्यातून दोन चिमुकल्या मुलांना विष पाजलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेसह दोन चिमुकल्यांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























