एक्स्प्लोर
सातारा हा शरद पवारांचा गड होता, मग ते इथून का लढत नाहीत? मोदींचा सवाल
उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत होत आहे.
सातारा : उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत होत आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर सातारा लोकसभेची जागा लढवत आहेत.
भाजपवासी झालेल्या उदयनराजेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः साताऱ्यात आले होते. यावेळी मोदींनी साताऱ्यात सभा घेतली. या सभेत मोदींनी उदयनराजेंचं कौतुक केले, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकादेखील केली.
मोदी म्हणाले की, सातारा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यामुळे भाजपच्या उदयनराजेंविरोधात शरद पवारांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. मग शरद पवार साताऱ्यातून निवडणूक का लढत नाहीत? स्वतःच्या किल्ल्यात लढण्याची हिंमत का करत नाहीत? पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील साताऱ्यातून लढण्यास नकार का दिला? असे सवाल मोदींनी उपस्थित केले.
साताऱ्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, साताऱ्याने देशाला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा थोर नेता दिला. सातारा ही माझी गुरुभूमी आहे. माझे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे याच पुण्यभूमीतले आहेत. त्यामुळे सातारा माझ्यासाठी तीर्थ आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement