Dilip Walse-Patil : रश्मी शुक्लांनी फोन कशासाठी टॅप केले? हे लवकरच समोर येईल : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी फोन कशासाठी टॅप केले? हे लवकरच समोर येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil ) यांनी दिली आहे.
Dilip Walse-Patil : "सार्वजनिक सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करण्याची परवानगी दिली जाते. परंतू पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी केलेल्या फोन टॅपमध्ये कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांनी हे फोन कशासाठी टॅप केले? हे लवकरच समोर येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil ) यांनी दिली आहे.
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, रश्मी शुक्ला यांनी काही फोन टॅप करून त्याचा राजकीय कामासाठी वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधानसभेतही आवाज उठवण्यात आला होता. शिवाय त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी चुकीच्या पद्धतीनं फोन टॅप केले होते, हे अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामूळेच त्यांच्यावर करवाई करण्यात आली आहे."
"काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय काकडे, आशीष देशमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर करवाई झाल्यामुळे शुक्ला यांच्यावर करवाई झाली असं बोललं जातं आहे, परंतू असं काही नाही. याबाबतचा अहवाल आल्यानंतरच शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिली आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rashmi Shukla : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल
- 'फोन टॅपिंगचा गोपनीय अहवाल फडणवीस नाही तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिकांनी उघड केला', रश्मी शुक्ला यांच्यावतीनं ॲड. महेश जेठमलानी यांचा दावा
- रश्मी शुक्ला यांचा फोन टॅपिंग बाबतचा अहवाल सरसकट देण्यास राज्य सरकारचा विरोध