एक्स्प्लोर

शेतकरी आत्महत्या नेमकी कशामुळे? सरकारची अचंबित करणारी उत्तरं!

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिलेल्या लेखी उत्तराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या जखमेवर मिठ चोळण्याचंच काम केलं आहे.

नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरु असताना सरकारला या आत्महत्या वाटत नसल्याचं त्यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून दिसून येत आहे. कारण, कर्जबाजारीपणामुळे 1 मार्च 2018 ते 31 मे 2018 या तीन महिन्यात तब्बल 639 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, यातील 122 प्रकरणं सरकारच्या निकषात बसत नसल्याने ती अपात्र ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून कुठलीही मदत मिळणार नाही. तर 188 प्रकरणं निकषात बसत असल्याने पात्र ठरली आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिलेल्या लेखी उत्तराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या जखमेवर मिठ चोळण्याचंच काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत की मृत्यू हे सांगण्यासाठी सरकारने दिलेली कारणं अचंबित करणारी आहेत. पहिलं प्रकरण मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या यवतमाळमधील उमरखेड सावळेश्वर गावात 14 एप्रिल 2018 माधवराव रावते या शेतकऱ्याने शेतात सरण रचून आत्महत्या केल्याचे वृत्त होतं. पण सरकारने आत्महत्या नसल्याचं सांगितलं. 14 एप्रिल रोजी माधवराव दुपारी साडे बारा वाजता शेताच्या परहाटीच्या ढिगाऱ्यावर सावलीत बसून बिडी पेटवत होते, पण विस्तावाची ठिणगी पडल्याने ढिगाऱ्याला आग लागली आणि तोल जाऊन माधवराव आगीत पडले. यात भाजून त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. माधवराव रावते यांना 29 नोव्हेंबर 2017 ला कर्जमाफी देण्यात आली. दुसरं प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील बोथबोडण गावातील सुंदरीबाई चव्हाण या विधवा महिलेने नांगरणीसाठी पैसे नाकारल्याने स्वतःला जाळून घेतले. पण सरकारनुसार, सुंदराबाई चव्हाण त्यांच्या मुलाकडे आल्या होत्या. 2 मे रोजी झोपेतून उठल्यावर केरोसिनचा दिवा अंगावर पडल्यामुळे त्या भाजल्या आणि उपचारादरम्यान 6 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. केरोसिनचा दिवा पडून भाजल्याने मृत्यू झाल्याचं कारण सरकारने विधानपरिषदेत दिलं. तिसरं प्रकरण यवतमाळमधील मौजे राजूरवाडी गावातील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. पण सरकारच्या मते, 10 एप्रिल रोजी शंकर चायरे यांनी विष प्राशन करुन फाशी घेण्याचा प्रयत्न करत केला, पण दोर तुटल्याने ते खाली पडले. शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असताना त्यांना मृत घोषित केलं. घटनास्थळी पंचनामा केला तेव्हा तुटलेली दोरी आणि मोनोसिल विषारी औषधांचा डब्बा आढळला. एक पात्र आणि दोन अपात्र या तीन प्रकरणात शंकर चायरे यांचं प्रकरण सरकारने पात्र ठरवलं असून त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. पण माधवराव रावते आणि सुंदराबाई चव्हाण यांची आत्महत्या शेती विषयक कारणाने झाली नसल्याचं सांगत अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना सरकार दरबारी या आत्महत्यांकडे कशा पद्धतीने पाहिलं जातं असल्याचं या विधानपरिषद लेखी उत्तरातून दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget