एक्स्प्लोर
देशाच्या सुरक्षेला धक्का लावल्यास त्याची गय करणार नाही : नितीन गडकरी
देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षेबाबत आमचे सरकार प्रखर आहे. तरिदेखील देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला, तर आम्ही त्याची गय करणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.

नागपूर : देशाची अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षेबाबत आमचे सरकार प्रखर आहे. तरिदेखील देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला, तर आम्ही त्याची गय करणार नाही. असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपुरात आयोजित अनुसूचित जाती मोर्चाच्या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात गडकरी बोलत होते. अधिवेशनात गडकरींनी काँग्रेसला लक्ष्य केले. गडकरी म्हणाले की, "पहिले राष्ट्र आणि मग आमचा पक्ष हीच आमच्या पक्षाची विचारधारा आहे. भाजप हा माँ बेट्याचा पक्ष नाही. इथे त्यांच्यासारखी एक नेता आणि बाकी कार्यकर्ता अशी परिस्थिती नाही." गडकरी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना म्हणाले की, "बाबासाहेबांनी धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड केली. बाबासाहेब भंडारा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढले, परंतु काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांना पराभूत केले. काँग्रेसने बाबासाहेबांच्या इंदूमिल येथील स्मारकाचा प्रश्न सुटू दिला नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच इंदूमिलचा प्रश्न लगेच सोडवला." गडकरी म्हणाले की, "नागपुरात दलित समाजाने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे नगरपालिका आणि ग्रामपंचायतसुद्धा आज आमच्याकडे आहे. इथे जातीचे राजकारण चालत नाही. जातीच्या नावावर कोणी राजकारण केले तर त्याला खपवून घेतले जात नाही." गडकरी म्हणाले की, "समाजातून जाती प्रथा आणि अस्पृश्यता नष्ट व्हायला पाहिजे. मी या गोष्टी मानत नाही. मी जाती-धर्माचा कधीही विचार करत नाही. मात्र काँग्रेसने आमचा चुकीचा प्रचार केला आहे. भाजप हा उच्च जातीच्या लोकांचा पक्ष आहे. इथे अस्पृश्यता आहे. असा अपप्रचार केला जातो. परंतु आम्ही सोशल एक्वॅलिटीवर काम करतो."
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























